शेतीमाल खरेदी, कृषी सेवा केंद्र सुरु ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:33 AM2021-05-16T04:33:02+5:302021-05-16T04:33:02+5:30
बीड : कोरोना महामारीच्या वाढत्या संसर्गामुळे बीड जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान ...
बीड : कोरोना महामारीच्या वाढत्या संसर्गामुळे बीड जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान खरीप हंगाम सुरु होण्यास काही दिवस उरलेले आहेत. त्यादृष्टीने सर्व खरेदी केंद्र व कृषी सेवा केंद्र सुरु ठेवावेत. खरेदीला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्ष जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
तब्बल एक वर्षापासून असलेल्या निर्बंधाचा फटका शेतकऱ्यांना देखील बसत आहे. तर, बीड जिल्ह्यात चालू असलेल्या कडक संचारबंदीमुळे रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, बाजरी, उन्हाळी बाजरी हा शेतीमाल तयार असून, विक्री करण्यास विलंब होत आहे. त्यातच खरीप हंगामाताली पिकपरणीकरता बियाणे, खते खरेदी करणए करणे गरजेचे आहे. यासाठी लागणारा पैसा उभा करण्यासाठी आहे तो शेतीमाल विक्री करणे गरजेचे आहे. त्यामुळे खरेदी केंद्र पुन्हा सुरु करण्यात यावीत व शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीसाठी परवानगी देण्यात यावी. पेरणीसाठी लागणारे आवश्यक सर्व साहित्याची दुकाने देखील लवकरात लवकर उघडून खरेदी व विक्रीची परवानगी देण्यात यावी. जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरु करून खरेदी सुरु करण्याच यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याकडे केली आहे.