कोरोना असला तरी प्रशिक्षणात सातत्य ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:23 AM2021-06-19T04:23:08+5:302021-06-19T04:23:08+5:30

बीड : कोरोना असल्याने गर्दी टाळण्याच्या दृष्टीने ऑनलाइन प्रशिक्षण सुरू आहे. कोराेना कमी झाल्यानंतर ऑफलाइन प्रशिक्षण द्या; परंतु सध्या ...

Continue training despite being a corona | कोरोना असला तरी प्रशिक्षणात सातत्य ठेवा

कोरोना असला तरी प्रशिक्षणात सातत्य ठेवा

Next

बीड : कोरोना असल्याने गर्दी टाळण्याच्या दृष्टीने ऑनलाइन प्रशिक्षण सुरू आहे. कोराेना कमी झाल्यानंतर ऑफलाइन प्रशिक्षण द्या; परंतु सध्या सुरू असलेले सातत्य कायम ठेवा, अशा सूचना औरंगाबाद येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ.अमाेल गित्ते यांनी दिल्या. त्यांनी शुक्रवारी बीडमधील रुग्णालयीन व जिल्हा प्रशिक्षण केंद्राला भेट देत आढावा घेतला.

आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना विविध योजना, कार्यक्रम व रुग्णसेवा आणि आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आवश्यक त्या सूचना व प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा व रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहेत. कोरोना असल्याने मागील वर्षभरापासून ऑनलाइन प्रशिक्षण दिले जात आहे. परंतु आता रुग्णसंख्या कमी होत असल्याने ऑफलाइन प्रशिक्षण देण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना डॉ. गित्ते यांनी दिल्या. यावेळी डॉ.अशोक हुबेकर, डॉ. संतोष गुंजकर, डॉ.जयवंत मोरे, डॉ.राहुल चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.हुबेकर यांनी रुग्णालयीन तर डॉ.गुंजकर यांनी जिल्हा प्रशिक्षण केंद्राचा लेखाजोखा मांडला. कामकाजाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी आर.वाय. कुलकर्णी, प्रकाश कुलकर्णी, अभय लोकरे आदी कर्मचारी उपस्थित होते.

चाैसाळा आरोग्य केंद्राचे मूल्यमापन

बीड तालुक्यातील चौसाळा आरोग्य केंद्राचे मूल्यमापनही डॉ.गित्ते यांनी केले. आरोग्य केंद्राची पाहणी केली तसेच प्रशिक्षणाचा आढावा घेतला. वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास खाकरे, डॉ.मंचुके यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

===Photopath===

180621\18_2_bed_17_18062021_14.jpeg

===Caption===

औरंगाबाद येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ.अमाेल गित्ते यांनी शुक्रवारी जिल्हा प्रशिक्षण केंद्राला भेट दिली. यावेळी डॉ.संतोष गुंजकर, डाॅ.जयवंत मोरे आदी कर्मचारी दिसत आहेत.

Web Title: Continue training despite being a corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.