बीड झेडपीच्या औषधी भांडारमध्ये कर्मचाऱ्याचा राडा; फार्मसी ऑफिसरच्या केबिनची तोडफोड
By सोमनाथ खताळ | Updated: April 26, 2023 19:08 IST2023-04-26T19:06:28+5:302023-04-26T19:08:01+5:30
शिपायांसह फार्मासिस्ट सोबत वाद घालत केली तोडफोड

बीड झेडपीच्या औषधी भांडारमध्ये कर्मचाऱ्याचा राडा; फार्मसी ऑफिसरच्या केबिनची तोडफोड
बीड : जिल्हा परिषद विभागाच्या औषधी भांडार विभागात क्षयरोग कार्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्याने राडा केला. फार्मसी ऑफिसरच्या केबीनच्या काचा फोडण्यासह इतर साहित्याचीही तोडफोड केली. ही घटना बुधवारी पाच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी बीड शहर ठाण्यात नोंद झालेली नाही.
जिल्हा रूग्णालयाच्या पाठिमागील बाजूस जिल्हा परिषदेचे औषधी भांडार आहे. येथे कोट्यवधी रूपयांची औषधी साठा असतो. बुधवारी ५ वाजेच्या सुमारास क्षयरोग विभागातील एक कंत्राटी कर्मचारी तेथे आला. त्याने शिपायांसह फार्मासिस्ट सोबत वाद घातले. त्यानंतर आतमध्ये जात फायबरच्या दरवाजावर लाथा मारून तो वाकविला.
तेथून फार्मसी ऑफिसर योगेश जोशी यांच्या कक्षाच्या दरवाजाचा काचा फोडल्या. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी भांडार विभागात धाव घेतली. सर्व परिस्थितीचा आढावाही घेतला. परंतू सायंकाळी ७ वाजेपर्यंत याप्रकरणात बीड शहर पोलिस ठाण्यात याची नोंद झाली नव्हती.