धारुर तहसील कार्यालयात चोवीस तास नियंत्रण कक्ष सुरू राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:30 AM2021-04-19T04:30:14+5:302021-04-19T04:30:14+5:30
धारूर : कोविड रुग्णांचे नियंत्रण करण्यासाठी धारुर शहरातील तहसील कार्यालयात २४ तास कोविड नियंत्रण कक्ष सुरू राहणार आहे, अशी ...
धारूर : कोविड रुग्णांचे नियंत्रण करण्यासाठी धारुर शहरातील तहसील कार्यालयात २४ तास कोविड नियंत्रण कक्ष सुरू राहणार आहे, अशी माहिती तहसीलदार वंदना शेडोळकर यांनी दिली.
धारुर तालुक्यात कोरोनाचा प्रार्दुभाव झपाट्याने वाढत आहे. तो नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या ब्रेक द चेन अंतर्गत नियमांचे पालन केले जाणार आहे. कोरोनाच्या बाबतील नागरिकांच्या तक्रारी व कोविड केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरु केला असल्याचेही तहसीलदार शेडोळकर यांनी सांगितले. या कक्षामध्ये २४ तास शिक्षकाची नेमणूक केली असून, शिक्षकांनी कोविड बाबतीत दूरध्वनीवर येणारे कॉल स्वीकारून लागलीच, त्या बाबतीमध्ये उपाययोजना करावयच्या आहेत. याबाबत नागरिकांना काही तक्रारी असल्यास त्यांनी संपर्क साधावा, यासाठी २४ तास कर्मचारी उपलब्ध असणार आहेत. लागलीच आवश्यक ती मदत पोहोचवली जाणार असल्याने याचा आरोग्य कर्मचारी तसेच नागरिक यांना फायदा होणार आहे. या कक्षाचा कोरोना रुग्ण व नातेवाईकांना फायदा होणार असल्याचे नायब तहसीलदार प्रकाश गोपड यांनी सांगितले.