चोऱ्यांवर नियंत्रण आणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:22 AM2021-01-01T04:22:53+5:302021-01-01T04:22:53+5:30

डांबरीकरणाची मागणी धारूर : येथील बसस्थानक परिसरातील सर्व डांबरीकरण उखडल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. बस मागे- पुढे ...

Control thefts | चोऱ्यांवर नियंत्रण आणा

चोऱ्यांवर नियंत्रण आणा

Next

डांबरीकरणाची मागणी

धारूर : येथील बसस्थानक परिसरातील सर्व डांबरीकरण उखडल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. बस मागे- पुढे होताना खडीचे दगड उडून लागण्याचे प्रकार होतात. यामुळे प्रवासी वैतागून गेले आहेत व जीव मुठीत घेऊन त्यांना चालावे लागते. त्यामुळे डांबरीकरणाची मागणी आहे.

नियमांची एैशीतैसी

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात दुचाकी वाहनचालक व ऑटोरिक्षा चालक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. शहरी व ग्रामीण भागात हे चित्र पाहायला मिळत आहे. पार्किंगही रस्त्यावर होते आहे. यामुळे वाहतूक कोंडी वाढतच आहे.

शेकोट्यांची ऊब

कडा : यंदाच्या वर्षी तालुक्यात वेळेवर समाधानकारक पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणावर नदी नाले तलावात पाणीसाठा आहे. थंडीला सुरूवात झाली असून ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत.

Web Title: Control thefts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.