भाजीमंडईतील कोंडी हटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:46 AM2021-01-08T05:46:30+5:302021-01-08T05:46:30+5:30
स्थानकात अस्वच्छता; आरोग्य धोक्यात अंबाजोगाई : अंबाजोगाई येथील बसस्थानकात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरल्याने प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बसस्थानकाच्या ...
स्थानकात अस्वच्छता; आरोग्य धोक्यात
अंबाजोगाई : अंबाजोगाई येथील बसस्थानकात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरल्याने प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बसस्थानकाच्या परिसरात ठिकठिकाणी पडलेले खड्डे, त्यात साठणाऱ्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असते. तसेच मोकाट जनावरांचा प्रादुर्भावही बसस्थानकात मोठ्या प्रमाणात असल्याने प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते.
पेठ भागात अवैध गतिरोधकामुळे त्रास
बीड : शहरातील पेठ भागात गल्लीबोळात तयार केलेल्या अवैध गतिरोधकांमुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा वाहने आदळून नुकसान होते. तसेच अपघाताचा धोका संभवतो. या गतिरोधकामुळे वाहनांची गती कमी होत असली तरी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे.
कर्जमुक्ती योजनेपासून शेतकरी वंचित
अंबाजोगाई : आधार लिंकिंग आणि तांत्रिक कारणांमुळे अंबाजोगाई तालुक्यात अद्यापही अनेक शेतकरी महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेपासून वंचित आहेत. विविध तांत्रिक कारणांमुळे या शेतकऱ्यांची आधार लिंकिंग होत नसल्यामुळे हे शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून वंचित आहेत.