गेवराई तालुक्यातील १८४ गावांत कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:36 AM2021-04-23T04:36:03+5:302021-04-23T04:36:03+5:30
तालुक्यात मागील वर्षी मार्चमध्ये इटकुर येथे कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला होता. त्यानंतर रूग्ण आढळत राहिले. शहराबरोबर तालुक्यातील ...
तालुक्यात मागील वर्षी मार्चमध्ये इटकुर येथे कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला होता. त्यानंतर रूग्ण आढळत राहिले. शहराबरोबर तालुक्यातील चकलांबा, तलवाडा,जातेगांव,उमापुर, मादळमोही या सर्कलच्या मोठ्या गावांसह छोटी छोटी गावे, वाडी, तांडा,वस्ती सह तालुक्यातील जवळपास शंभरहू जास्त गावात कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे. त्यामुळे उपचारकामी आरोग्य यंत्रणादेखील अपुरी पडु लागली आहे. सध्या शहरातील उपजिल्हा रुग्णालयात व तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच प्रत्येक गावात जाऊन नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. मात्र लोकसंख्येचा विचार केल्यास चाचणी करण्याचे ठिकाण वाढवणे गरजेचे झाले आहे.
ऑक्सिजन पुरवठा घटला
सध्या तालुक्यातील चार कोविड केअर सेंटरमध्ये जवळपास ४०० रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच शहरातील उपजिल्हा रूग्णालयात ६० बेडसाठी ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध आहे. मात्र ऑक्सिजनचा कमी प्रमाणात पुरवठा होत आहे. तर इतर तीन ठिकाणच्या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन सुविधा अद्याप उपलब्ध झालेली नाही.
फोटो : गेवराई येथील उपजिल्हा रूग्णालयातील कोव्हिड सेंटर , ऑक्सिजन युनिट
===Photopath===
220421\20210408_114356_14.jpg~220421\20210422_104252_14.jpg