आष्टी तालुक्यात कोरोनाचा कहरच; आणखी ९८ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:34 AM2021-04-07T04:34:16+5:302021-04-07T04:34:16+5:30

आष्टी तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून व्यापारी आणि नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात कोरोना टेस्ट केल्या जात आहेत. या अँटीजेन टेस्टमध्ये अनेक ...

Corona in Ashti taluka; Another 98 affected | आष्टी तालुक्यात कोरोनाचा कहरच; आणखी ९८ बाधित

आष्टी तालुक्यात कोरोनाचा कहरच; आणखी ९८ बाधित

Next

आष्टी तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून व्यापारी आणि नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात कोरोना टेस्ट केल्या जात आहेत. या अँटीजेन टेस्टमध्ये अनेक व्यापारी आणि नागरिक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले आहे.

गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोना बाधितांची संख्या आष्टी तालुक्यात झपाट्याने वाढली आहे. मंगळवारी आलेल्या अहवालामध्ये तब्बल ९८ कोरोना बाधित आढळून आले आहेत. यामध्ये जामगाव येथील रुग्णांची संख्या पंचवीस इतकी आहे. सोमवारी येथे २२ रुग्ण निघाले होते.

आष्टी तालुक्यातील आष्टी, कडा, धानोरा, धामणगाव या परिसरातील नागरिक आणि व्यापारी कोरोना बाधित होत असल्याचे दिसत आहे. यामध्ये आरोग्य विभाग, शाळा, स्टेट बँक ऑफ इंडिया, यातील कर्मचारी आणि व्यापारी यांचा समावेश आहे.

आष्टी तालुक्यात कोरोना समूळ नष्ट करण्यासाठी प्रशासन आरोग्य विभागाच्या मदतीने काम करत आहे. त्यामुळे अधिकाधिक सुप्त असलेले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण या अँटीजेनच्या माध्यमातून समोर येत आहेत. ग्रामीण भागातही कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

प्रशासनाने दिलेल्या नियमाचे पालन करावे व कोरोनाचे लक्षण आढळून आले तर तत्काळ रुग्णालयात जाऊन अँटीजेन टेस्ट करून घ्यावी व कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्यांनी कोविड सेंटरमध्ये दाखल होऊन उपचार घ्यावा तसेच नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी केले आहे.

Web Title: Corona in Ashti taluka; Another 98 affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.