कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीला ब्रेक; घराघरात वाढली चारचाकी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:33 AM2021-07-29T04:33:24+5:302021-07-29T04:33:24+5:30
१) दुचाकी - चारचाकी विक्री वाढली दुचाकी चारचाकी २०१९ ...
१) दुचाकी - चारचाकी विक्री वाढली
दुचाकी चारचाकी
२०१९ १५००० ९००
२०२० १३००० ११००
२०२१ (जुलैपर्यंत) ११००० १०००
२) ऑटोची विक्री घटली
ऑटो
२०१९ २१०
२०२० १२०
२०२१ (जुलैपर्यंत) ६५
३) ऑटोचालक परेशान
कोरोनानंतरच्या परिस्थितीमुळे रिक्षा व्यवसाय पूर्णत: कोलमडला आहे. पेट्रोलचे भाव ११० पर्यंत पोहोचले. त्यात १५ रुपयांचे ऑईल टाकावे लागते. प्रवाशांची संख्या, भाडे कमी मिळत असल्याने उत्पन्न घटले आहे. आहे त्या रिक्षा चालकांचे हाल पाहता नवीन रिक्षा खरेदी करण्याचे धाडस कोण करणार? -- एस. एम. युसूफ, रिक्षा चालक, बीड.
---------
कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून रिक्षा व्यवसाय संकटात आहे. पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. रिक्षा चालकांचे उत्पन्न घटले आणि महागाईमुळे खर्च वाढले आहेत. अनेक रिक्षाचालक हा व्यवसाय सोडून इतरत्र कामे करत उदरनिर्वाह भागवित आहेत. जे या व्यवसायात आहेत, त्यांना घरप्रपंच चालविणे कठीण झाले आहे. -- किशोर काटकर, रिक्षा चालक, बीड.
----------
म्हणून घेतली चारचाकी
कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून सार्वजनिक खासगी वाहतूक अथवा बसने प्रवास करणे धोक्याचे वाटत होते. कुटुंब मोठे असल्याने प्रवासाकरिता सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच बीडमध्ये सेवा चांगली मिळत असल्याने चारचाकी खरेदी केली. -- प्रसाद तांबवेकर, बीड.
-------
कोरोनामुळे सार्वजनिक वाहतुकीने गर्दीत प्रवास करायला नको. या प्रमुख हेतूने चारचाकी खरेदी केली. यामुळे कुटुंबासह प्रवास करणे सुलभ झाले तसेच बाहेरगावी महत्त्वाची कामे तत्परतेने उरकता येतात. -- दिनेश लोळगे, बीड.
------------------