कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणाला महत्त्व आले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:39 AM2021-08-20T04:39:00+5:302021-08-20T04:39:00+5:30
धारूर : येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ग्रंथालय विभागाच्या वतीने ...
धारूर : येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ग्रंथालय विभागाच्या वतीने ‘बेस्ट प्रॅक्टिसेस फॉर एन्हान्सिंग ई लर्निंग रिसोर्सेस अ स्पेक्ट्रम’ या विषयावरील एकदिवसीय ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्र पार पडले. यावेळी कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ हे होते. प्रारंभी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कै. विनायकराव पाटील, कै. रामराव आवरगावकर, कै. सुंदरराव सोळंके यांना अभिवादन केले. आजच्या स्थितीमध्ये कोरोना महामारीच्या प्रभावातून एकही व्यक्ती, समाज, समूह, देश सुटलेला नाही. याचा परिणाम केवळ आर्थिक गोष्टींवर नव्हे, तर संपूर्ण मानवांवर झल्याचे मत प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ यांनी व्यक्त केले. ग्रंथपाल व संयोजक गोपाळ सगर यांनी विषय व त्याची निकड याविषयी माहिती दिली. नांदेड येथील एम. जी. एम. महाविद्यालयाचे प्राचार्य गोविंद हंबर्डे यांनी उद्घाटन केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे मत्स्योदरी महाविद्यालय, अंबडचे प्राचार्य शिवशंकर घुमरे यांनी ‘ऑनलाईन ई लर्निंग रिसोर्सेस’ विषयावर बीजभाषण केले. प्रा. विद्यासागर संगरेड्डी यांनी कोरोना आपत्तीमुळे ई लर्निंग साधनांना अनन्यसाधरण महत्त्व प्राप्त झाल्याचे राष्ट्रीय चर्चासत्रात ७५० जणांनी नोंदणी केली. २०० पेक्षा जास्त संशोधक, प्राध्यापकांनी आपला प्रत्यक्ष सहभाग नोंदविला होता. उपप्राचार्य मेजर मिलिंद गायकवाड व प्रा. महादेव जोगडे यांची उपस्थिती होती. डॉ. डी. एन. गंजेवार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. गोपाळ काकडे यांनी आभार मानले.