कोरोनामुळे हनुमान जन्मोत्सव परळीत साध्या पद्धतीने साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:25 AM2021-04-29T04:25:31+5:302021-04-29T04:25:31+5:30
मंगळवारी शहरातील विविध मंदिरामध्ये बजरंगबली श्री हनुमान जन्मोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. राज्यात व परिसरात कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन ...
मंगळवारी शहरातील विविध मंदिरामध्ये बजरंगबली श्री हनुमान जन्मोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. राज्यात व परिसरात कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन आदेश असल्याने श्री हनुमान जन्मोत्सवावर त्याचे सावट होते. सर्व मंदिरे बंद असली तरीही मंदिरातील पुजारी यांनी श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त फुलांची व रांगोळीची सुंदर व आकर्षक सजावट करून मंदिर सजविले होते. यावेळी श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त पूजा व आरती करण्यात आली. तसेच मंदिराच्या आवारात उपस्थित भाविक भक्तांनी सोशल डिस्टन्स पाळून श्रींचे मनोभावे दर्शन घेतले. शहरातील श्री प्रती वैद्यनाथ, मोंढा भागातील संकट मोचन श्री हनुमान मंदिर, श्री हरिहर तीर्थ येथील मारुती मंदिर, श्री वेताळ मंदिर, श्री गोराराम मंदिर, श्री काळाराम मंदिर, श्री दक्षिण मुखी गणपती मंदिर, श्री साई मंदिर आदी ठिकाणी श्री हनुमान जन्मोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
===Photopath===
280421\img-20210428-wa0354_14.jpg