खांडवी उपकेंद्रात १०८ जणांची कोरोना तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:36 AM2021-04-23T04:36:06+5:302021-04-23T04:36:06+5:30
गेवराई : तालुक्यातील निपाणी जवळका प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असलेल्या खांडवी येथील उपकेंद्रात व्यापारी, दूध विक्रेते, रिक्षा चालक, हॉटेल चालक ...
गेवराई : तालुक्यातील निपाणी जवळका प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असलेल्या खांडवी येथील उपकेंद्रात व्यापारी, दूध विक्रेते, रिक्षा चालक, हॉटेल चालक यांच्यासह अनेक व्यावसायिकांची अँटिजेन तपासणी केली. दिवसभरात १०८ जणांची तपासणी झाली. यात आठजण पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. पाचजणांची घशाची तपासणी करून त्यांचे रिपोर्ट आंबेजोगाई येथे पाठविण्यात आले आहेत.
तालुका आरोग्य अधिकारी संजय कदम, निपाणी जवळका प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय माने यांच्या सूचनेनुसार ही मोहीम राबविण्यात आली. खांडवी उपआरोग्य केंद्रातील डॉ. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी केली. यावेळी अमोल पत्की, आरोग्य सुपरवायझर सुधाकर गव्हाणे, आरोग्यसेविका सत्यभामा बनकर, राहुल काळे यांच्यासह आशा स्वयंसेविका मीना चव्हाण, सुमन बोराडे यांंनी परिश्रम घेतले.