कोरोनाचे ४६ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:33 AM2021-04-21T04:33:18+5:302021-04-21T04:33:18+5:30

कालिका देवीचा प्रकट दिन बंद मंदिरातच शिरूर कासार : चैत्र शुद्ध अष्टमी म्हणजेच कालिका देवीचा प्रकट दिन समजला जातो. ...

Corona has 46 new patients | कोरोनाचे ४६ नवे रुग्ण

कोरोनाचे ४६ नवे रुग्ण

googlenewsNext

कालिका देवीचा प्रकट दिन बंद मंदिरातच

शिरूर कासार : चैत्र शुद्ध अष्टमी म्हणजेच कालिका देवीचा प्रकट दिन समजला जातो. या निमित्ताने कालिका देवी मंदिरात पहाटे पालखी छबीना मिरवणूक असते. मात्र, सध्या कोरोना नियमावलीत बंद मंदिरातच प्रकट दिन साजरा झाला. यावेळी पंच व विश्वस्त मंडळाचीच उपस्थिती होती.

रामनवमीवर कोरोनाचे सावट

शिरूर कासार : मर्यादापुरुषोत्तम प्रभूराचंद्रांचा जन्मोत्सव म्हणजेच रामनवमी गावोगावी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. कीर्तन, प्रवचन आणि अन्नदान असे उपक्रम राबविले जातात. एक वेगळे चैतन्य दिसून येणारा हा रामजन्मोत्सव बुधवारी अगदी औपचारिकता म्हणूनच साजरा करावा लागणार आहे. शिरूर येथील राममंदिरात उत्सव होत असतो. यावर्षी मात्र कोविड नियमांचे पालन करून रामनवमी साजरी होणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Corona has 46 new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.