वर्षभरात आष्टी तालुक्यात दहा हजार लोकांना कोरोनाची लागण ; २७० जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:23 AM2021-07-10T04:23:38+5:302021-07-10T04:23:38+5:30

आरोग्य विभाग दिवसरात्र झटत असला तरी इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी सक्रिय नसल्याने तालुक्यातील आकडा कमी होताना दिसत नाही. आष्टी ...

Corona infection in tens of thousands of people in Ashti taluka during the year; 270 killed | वर्षभरात आष्टी तालुक्यात दहा हजार लोकांना कोरोनाची लागण ; २७० जणांचा मृत्यू

वर्षभरात आष्टी तालुक्यात दहा हजार लोकांना कोरोनाची लागण ; २७० जणांचा मृत्यू

Next

आरोग्य विभाग दिवसरात्र झटत असला तरी इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी सक्रिय नसल्याने तालुक्यातील आकडा कमी होताना दिसत नाही.

आष्टी तालुक्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेऐवजी दुसरी लाट भयंकर होती आणि आहे. त्यातच प्रशासनाने घालून दिलेले नियम कोणत्याच गावात, बाजारात, सार्वजनिक कार्यक्रमात, पाळले जात नसल्याने तालुक्यातील आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असल्याने प्रशासनाचे आता डोळे उघडले आहेत. दिवसरात्र एकटा आरोग्य विभाग गावोगावी फिरत आहे. पण त्याच्या दिमतीला महसूल, पंचायत समिती यासह इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी असणे बंधनकारक असताना असे होताना दिसत नसल्याने व त्यांच्या हालगर्जीपणामुळे कोरोना उतरणीला लागत नसल्याचे दिसून येत आहे.

प्रशासनाने गांभीर्याने घेऊन नागरिकांना विश्वासात घेत, ग्रामसुरक्षा समितीच्या लोकांना दैनंदिन हजेरी व गावात नजर ठेवायला लावली तर नक्कीच कोरोना संख्या आटोक्यात येईल, असे सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब जगताप यांनी सांगितले.

अशी आहे आरोग्य विभागाकडे आकडेवारी

गेल्या वर्षभरात आष्टी तालुक्यात १० हजार ३६९ रुग्ण आढळले असून २७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वर्षभरात आरटीपीसीआर च्या एकूण १२ हजार ८७१ तर अँटिजनच्या एकूण ५० हजार ३८९ असे एकूण ६२ हजार २६० जणांच्या तपासण्या करण्यात आल्या. आष्टी तालुक्यात सध्या २८९ रुग्ण ॲक्टिव्ह असून ७३ रुग्ण आष्टी ग्रामीण रुग्णालयातील सीसीसी. सेंटर येथे तर आयटीआय. सेंटर मध्ये २५ तर मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगाव येथे १५ रुग्ण उपचार घेत आहेत. बाकी १७६ रुग्णांना रेफर करण्यात आले आहे. असे आष्टी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन मोरे यांनी लोकमतला सांगितले.

Web Title: Corona infection in tens of thousands of people in Ashti taluka during the year; 270 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.