खासगी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना तपासणी बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:34 AM2021-03-31T04:34:34+5:302021-03-31T04:34:34+5:30
बीड : मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे तसेच जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँका, ...
बीड : मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे तसेच जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँकेतील व इतर कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी हे कोविड संक्रमित होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच त्यांच्यापासून इतरांना धोका होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. सर्वांनी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी केले आहे.
५ एप्रिलनंतर कोणतेही अधिकारी, कर्मचारी हे अँटिजेन व आरटीपीसीआर तपासणी न करता कार्यालयात उपस्थित राहणार नाहीत, याची सर्व बॅंक शाखा प्रमुख तसेच खासगी कार्यालय प्रमुख यांनी दक्षता घ्यावी. या आदेशाचे पालन न करणारे व उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारादेखील देण्यात आला आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या व संसर्ग वाढणार नाही यासाठी आरटीपीसीआर किंवा अँटिजन तपासणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या आदेशाचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.