गेवराई नगरपरिषदेत कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:33 AM2021-04-16T04:33:37+5:302021-04-16T04:33:37+5:30
कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्यापासून येथील उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले होते. या ठिकाणी दररोज शंभरहून ...
कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्यापासून येथील उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले होते. या ठिकाणी दररोज शंभरहून जास्त लोकांना लस दिली जात होती. मात्र या ठिकाणी अपुरी जागा व गर्दी होत असल्याने पर्यायी केंद्र सुरू करावे लागले आहे. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. महादेव चिंचोळे यांनी नगरपरिषद कार्यालयात कोरोना लस केंद्र सुरू केले. शहरातील मुख्य ठिकाण तसेच प्रशस्त जागा व शहरातील काही भागातील नागरिकांना हे ठिकाण सोयीचे आहे. नगरपरिषद कार्यालयातील कोरोना लसीकरण केंद्र सुरू राहणार असून शहरातील नागरिकांनी चाचणी करून घेण्याचे आवाहन येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. महादेव चिंचोळे यांनी केले आहे.
===Photopath===
150421\sakharam shinde_img-20210415-wa0014_14.jpg