शेरीत कोरोना प्रतिबंधक लसीकरण ९९ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:23 AM2021-06-10T04:23:15+5:302021-06-10T04:23:15+5:30
आष्टी तालुक्यातील बीड नगर राज्य महामार्गावर असलेले तीन हजार लोकसंख्येच्या घरातील गाव. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण, फवारणी, जनजागृती, ...
आष्टी तालुक्यातील बीड नगर राज्य महामार्गावर असलेले तीन हजार लोकसंख्येच्या घरातील गाव. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण, फवारणी, जनजागृती, लाऊड स्पीकर माध्यमातून रोज नवनवीन माहिती देण्यासोबत विविध प्रयोग केले. तरी देखील कोरोनाची लागण झाली. पण यातून खबरदारी घेण्यासाठी प्रशासनाने ४५ वर्षांच्या पुढील नागरिकांना लसीकरण करण्याचे आवाहन केले. याला प्रतिसाद देत येथील शेरी गावातील सरपंच, उपसरपंच, आरोग्य विभाग, तरूणांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन व्यक्तींचे आधार व मोबाईल नंबर घेऊन लसीकरण करण्याचा मान या गावाने मिळवला आहे.
----------
शेरी येथे ४५ वर्षांपुढील लोकसंख्या १,३२० आहे. यापैकी जवळपास १,२९० लोकांचे अंदाजे ९८ -९९ टक्के ४५ वर्षांवरील लोकांचे लसीकरण झाले असल्याचे कडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल आरबे यांनी सांगितले.
----------
गावातील तरूण, आरोग्य विभाग, व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घरोघरी जाऊन नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले. आता ९९ टक्के लसीकरण झालेले जिल्ह्यातील पहिले गाव म्हणून आमच्या शेरीचा उल्लेख करावा लागेल, असे सरपंच संदीप खाकाळ, उपसरपंच दीपक सोनवणे यांनी लोकमतला सांगितले.
---------