दोन दिवस कोरोनाने उच्चांक गाठले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:35 AM2021-05-06T04:35:41+5:302021-05-06T04:35:41+5:30
शिरूर कासार : तालुक्यात मंगळवारी (दि. ४) आणि बुधवारी अशा दोन दिवसांत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याने उच्चांक गाठला ...
शिरूर कासार : तालुक्यात मंगळवारी (दि. ४) आणि बुधवारी अशा दोन दिवसांत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याने उच्चांक गाठला गेला आहे. मंगळवारी तालुक्यात २०६, तर बुधवारी १३८ बाधित रुग्ण निघाले असल्याने तालुका चिंताग्रस्त झाला आहे.
उन्हाळी मुगाची तोडणी सुरू
शिरूर कासार : यंदा उन्हाळी मुगाची पेरणी झाली होती. पाणी उपलब्ध असल्याने अल्पकाळात येणाऱ्या मुगाला पसंती दाखवली गेली होती. आता या मुगाच्या शेंगांची तोडणी सुरू झाल्याचे शेतशिवारात दिसून येत आहे.
वीज कंपनीने अडथळे दूर करावेत
शिरूर कासार : महिनाभरावर पावसाळा येऊन ठेपला आहे. पाऊसवारे सुरू होण्यापूर्वीच वीज वितरण कंपनीने लोंबकळलेल्या वीजवाहिन्या, झाडाझुडपांतील अडकलेल्या तारा, उघड्या धोक्याच्या डीपीबाबत सुरक्षेच्या दृष्टीने पावसाळ्यापूर्वी काम करून संभाव्य धोके टाळावेत, अशी मागणी होत आहे.
तळी भरलेले; तरी नळाला पाणी वेळेवर नाही
शिरूर कासार : शहराला पाणीपुरवठा होत असलेले उथळा, सिंदफणा ही तळी भरलेली असली तरी नळाला पंधरा-पंधरा दिवस पाणी येत नसल्याने पाणी लवकर सोडण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
ऊसतोड मजूर गावाकडे परतू लागला
शिरूर कासार : तालुक्यातून ऊसतोडीसाठी मजुरांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असते. आता गाळप हंगाम संपत आल्याने कारखान्यावरील मजूर गावाकडे परतू लागल्याचे दिसून येत आहे.
शेणखत शेतात टाकण्याची लगबग
शिरूर कासार : आता पावसाळा एक महिन्यावर आला असून त्यापूर्वीच शेतमशागत पूर्ण करण्यासाठी शेतकरी कामाला लागले आहेत. तसेच शेतात शेणखत टाकण्याची लगबग सुरू असल्याचे दिसून येत आहे.