गेवराईत लसीकरण केंद्रावरच कोरोनाचे नियम पायदळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:35 AM2021-04-20T04:35:07+5:302021-04-20T04:35:07+5:30
तालुक्यात आता कोरोना प्रतिबंध लसीकरण मोठ्या प्रमाणात होत असून, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात व शहरातील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना ...
तालुक्यात आता कोरोना प्रतिबंध लसीकरण मोठ्या प्रमाणात होत असून, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात व शहरातील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण केंद्राची जागा कमी पडू लागल्याने नगर परिषद कार्यालयात नव्याने केंद्र सुरू करण्यात आले. मात्र, येथे केंद्र सुरू झाल्यापासून रोज मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. सोमवारी सकाळपासून लस घेण्यासाठी नागरिक, महिलांची गर्दी जमली होती. मात्र, येथे कोणताही कर्मचारी नसल्याने लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांकडून कोरोना नियमांचे पालन होत नसल्याचे दिसत होते. याठिकाणी कसलेही सोशल डिस्टन्स दिसत नव्हते. नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. तसेच येथे कोणताही कर्मचारी रांगा लावण्यासाठी उपस्थित नव्हता. सगळीकडे गोंधळ निर्माण झाला होता.
===Photopath===
190421\sakharam shinde_img-20210419-wa0009_14.jpg