बैल बाजारात पायदळी तुडविले कोरोनाचे नियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:22 AM2021-02-22T04:22:06+5:302021-02-22T04:22:06+5:30

कडा : सध्या कोरोनाची तिसरी लाट सुसाट वेगात येऊ लागल्याने प्रशासनाने कोरोना प्रतिबंधासाठी नियमावली जारी केली असली तरी ती ...

Corona rules trampled on bull market | बैल बाजारात पायदळी तुडविले कोरोनाचे नियम

बैल बाजारात पायदळी तुडविले कोरोनाचे नियम

googlenewsNext

कडा : सध्या कोरोनाची तिसरी लाट सुसाट वेगात येऊ लागल्याने प्रशासनाने कोरोना प्रतिबंधासाठी नियमावली जारी केली असली तरी ती फक्त कागदावरच असल्याचे चित्र आष्टी तालुक्यातील कडा येथे रविवारी बैल बाजारात दिसून आले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरलेल्या या बाजारात विनामास्क आणि सामाजिक अंतर न ठेवता बाजारकरू प्रशासनाचे नियम सर्रास पायदळी तुडविताना दिसून आले.

आष्टी तालुक्यातील कडा येथील कृउबा समिती आवारात दर रविवारी आठवडी बाजार भरतो. आता कोरोनाचा उद्रेक होऊ लागल्याने प्रशासनाने नियमावली तयार करून त्यांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गर्दी करू नये, विनामास्क फिरू नये, सोशल डिस्टन्स ठेवावे यासाठी जनजागृती करण्यात आली. तरीदेखील कडा येथील आठवडी बैल बाजारात बाहेरील जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर जनावरे, शेळ्या खरेदी-विक्रीसाठी येतात. यात व्यापारी तसेच शेतकरीदेखील असतात. परंतू कृउबा समितीने कसलीच जनजागृती केली नसल्याने तसेच नियमावली दिली नसल्याने तोबा गर्दीचे चित्र पाहावयास मिळाले. ‘ना मास्क, ना सोशल डिस्टन्स’ यामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो नियमांकडे कानाडोळा करून हयगय करणाऱ्यांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी शिवक्रांतीचे युवक प्रदेश अध्यक्ष दीपक सोनवणे यांनी केली आहे.

याबाबत आष्टी येथील तहसीलदार राजाभाऊ कदम यांना विचारणा केली असता ते म्हणाले की वैयक्तिक कोणाला सूचना दिल्या नाहीत. असे काही असेल तर तसे त्यांना मास्क वापरासह कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जातील.

फोटो- नियमांना डावलून सार्वजनिक ठिकाणी जमलेली हीच ती गर्दी.

===Photopath===

210221\nitin kmble_img-20210221-wa0012_14.jpg

Web Title: Corona rules trampled on bull market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.