शहरांपाठोपाठ आता ग्रामीण भागात कोरोना सुसाट; नागरिकही गाफीलच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:31 AM2021-04-15T04:31:38+5:302021-04-15T04:31:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अंबाजोगाई आणि बीड शहरांसह तालुक्यांमध्ये तर ...

Corona Susat now in rural areas, followed by cities; Citizens are also unaware | शहरांपाठोपाठ आता ग्रामीण भागात कोरोना सुसाट; नागरिकही गाफीलच

शहरांपाठोपाठ आता ग्रामीण भागात कोरोना सुसाट; नागरिकही गाफीलच

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अंबाजोगाई आणि बीड शहरांसह तालुक्यांमध्ये तर हॉटस्पॉटसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत शहरात रुग्ण वाढत होते, परंतु आता ग्रामीण भागातही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. बाधित रुग्ण होम आयसोलेशन घेत असले, तरी घरी काळजी घेत नाहीत. तसेच आरोग्य विभागाकडून बाधितांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतला जातो. परंतु, चाचणी करण्यासाठी बोटावर माेजण्याइतकेच लोक पुढे येत असल्याचे दिसते.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ३४ हजारांच्या घरात पोहोचला आहे. रोज हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण सापडत असून ५ ते १० लोकांचा रोज मृत्यू होत आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांचा टक्काही घसरल्याने जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. अगोदर शहरांमध्येच जास्त प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण सापडत होते. परंतु, आता ग्रामीण भागातही ही संख्या झपाट्याने वाढत आहे. असे असले तरी नागरिक गाफीलच राहत आहेत. मास्क, सोशल डिस्टन्स ठेवून हात सॅनिटाइझ करण्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. आरोग्य विभागासह प्रशासनही आता हतबल झाले आहे. उपाययोजना करण्यात ते अपयशी ठरत आहेत.

वॉच ठेवणाऱ्या समित्या गायब

n होम क्वारंटाइन व होम आयसोलेट केलेल्या लाेकांवर वॉच ठेवण्यासाठी प्रत्येक गावात समित्या नियुक्त केल्या होत्या.

n सुरुवातीचे काही दिवस या समित्यांनी योग्य जबाबदारी पार पाडली.

n सध्या या समित्या गायब असून सर्वच लोक वाऱ्यावर आहेत.

चाचणी करण्याकडे दुर्लक्ष

n ग्रामीण भागात बाधितांच्या संपर्कातील कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत असल्याचा दावा आरोग्य विभाग करीत असला, तरी प्रत्यक्षात ट्रेस झालेल्यांची कोरोना चाचणी होत नसल्याचे अनेक प्रकरणांवरून समोर आले आहे. त्यामुळे संसर्ग वाढत आहे.

काॅन्टॅक्ट ट्रेसिंग होत असून काळजीही घेतो

शहर असो वा ग्रामीण भाग, कोरोनाबाधितांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतला जात आहे. तसेच चाचण्याही केल्या जातात. बाधितांवर कर्मचारी, आशांमार्फत नजर ठेवली जाते. - डॉ. आर.बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी बीड

===Photopath===

140421\14_2_bed_9_14042021_14.jpeg

===Caption===

बीड बसस्थानकातून ग्रामीण भागात जाणाऱ्रूा मार्गावर धावणाऱ्या बसेसमध्ये नागरिकांची गर्दी होत आहे.

Web Title: Corona Susat now in rural areas, followed by cities; Citizens are also unaware

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.