कारागृहातील ३०० कैद्यांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:33 AM2021-03-16T04:33:03+5:302021-03-16T04:33:03+5:30
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना वाढत असल्याने आणि आरोपींची आवक, जावकही वाढल्याने कारागृह प्रशासनाने या सर्वांची कोरोना चाचणी करण्याचा ...
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना वाढत असल्याने आणि आरोपींची आवक, जावकही वाढल्याने कारागृह प्रशासनाने या सर्वांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे सोमवारी सकाळीच आराेग्य विभागाचे पथक कारागृहात दाखल झाले. १४ महिलांसह ३० कैद्यांचे आरटीपीसीआर स्वॅब घेण्यात आले. या सर्वांचे अहवाल मंगळवारी दुपारनंतर येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. चाचणी करताना कारागृह अधीक्षक विलास भोईटे, वरिष्ठ कारागृह निरीक्षक एम. एस. पवार, शरद माळशिकारे यांची उपस्थिती होती.
कैद्यांसाठी स्वतंत्र सेंटर
कारागृहातील एखादा आरोपी अथवा कैदी दुदैवाने कोरोनाबाधित आढळला तर त्याच्यासाठी स्वतंत्र कोरोना सेंटर असणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.सूर्यकांत गित्ते यांनी सांगितले. यापूर्वीही आयटीआयमधील कोरोना केअर सेंटरमधून एका आरोपीने धूम ठोकली होती. आता यावेळी तरी प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने नियोजन करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.