कोरोनाने घेतला आणखी तिघांचा जीव; ४१ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:37 AM2021-09-22T04:37:22+5:302021-09-22T04:37:22+5:30

जिल्ह्यात सोमवारी २ हजार २७३ संशयितांची तपासणी करण्यात आली. त्याचे अहवाल मंगळवारी मिळाले. यात २ हजार २३२ निगेटिव्ह, तर ...

Corona took the lives of three more; 41 new patients | कोरोनाने घेतला आणखी तिघांचा जीव; ४१ नवे रुग्ण

कोरोनाने घेतला आणखी तिघांचा जीव; ४१ नवे रुग्ण

Next

जिल्ह्यात सोमवारी २ हजार २७३ संशयितांची तपासणी करण्यात आली. त्याचे अहवाल मंगळवारी मिळाले. यात २ हजार २३२ निगेटिव्ह, तर ४१ अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ४, आष्टी ३, बीड ९, गेवराई ५, केज १४, पाटोदा ४ आणि शिरुर व वडवणी तालुक्यातील प्रत्येकी १ रुग्णाचा समावेश आहे. दिवसभरात ४१ रुग्णांनी कोरोनावर मात केली, शिवाय गत चोवीस तासांत तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. आता जिल्ह्यातील बाधितांचा एकूण आकडा १ लाख २ हजार ४१९ इतका झाला आहे, तर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ९९ हजार १३७ इतकी झाली आहे. आतापर्यंंत २ हजार ७४८ जणांचा बळी गेला आहे. सध्या ५३४ रुग्ण उपचाराखाली आहेत.

Web Title: Corona took the lives of three more; 41 new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.