गेवराईत विनामास्क फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी, दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:32 AM2021-07-29T04:32:51+5:302021-07-29T04:32:51+5:30
गेवराई : तालुक्यात कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर २८ दिवस थंडावलेली कारवाई प्रशासनाने पुन्हा जोमाने सुरू केली आहे. ...
गेवराई : तालुक्यात कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर २८ दिवस थंडावलेली कारवाई प्रशासनाने पुन्हा जोमाने सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने बुधवारी नगर परिषद, पोलीस, महसूल विभागाने संयुक्त कारवाई केली. सकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विनामास्क फिरणाऱ्या ५३ जणांकडून १०० रुपयांप्रमाणे एकूण ५ हजार ३०० रुपये दंड आकारण्यात आला, तर ८८ जणांची अँटिजन, आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.
मागील काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी गेवराई, पाटोदा, आष्टी, शिरूर या तालुक्यांत कडक निर्बंध लावलेले आहेत. यात तालुक्यातील व्यापारी पेठा सकाळी ७ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत उघडण्याची मुभा होती. मात्र, एकही दिवस याचे पालन झाले नाही, तसेच विनामास्क फिरणाऱ्यांवरील कारवाई थंडावली होती. बुधवारी सकाळी १० ते १२ या दोन तासांत १४१ जणांवर दंड व चाचणी, अशी कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ, नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे, तलाठी माणिक पांढरे, जितेंद्र लेंडाळ, नानासाहेब कटारनवरे, राम सौंदरमल, संतोष सौंदरमल, प्रफुल्ल शहाणे, उपजिल्हा रुग्णालयाचे पंडित, संदीप राठोड, महेश मरकड, वसंत पवार आदी कारवाईत सहभागी होते.
280721\20210728_102628_14.jpg~280721\20210728_102714_14.jpg