मोठेवाडीत २०० नागरिकांचे कोरोना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:34 AM2021-08-23T04:34:56+5:302021-08-23T04:34:56+5:30

गंगामसला : माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात आली.या लसीकरण मोहिमेचे उद्घाटन सरपंच अविनाश ...

Corona vaccination of 200 citizens in Mothewadi | मोठेवाडीत २०० नागरिकांचे कोरोना लसीकरण

मोठेवाडीत २०० नागरिकांचे कोरोना लसीकरण

Next

गंगामसला : माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात आली.या लसीकरण मोहिमेचे उद्घाटन सरपंच अविनाश गोंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

कोरोना साथ रोगाने सर्वत्र थैमान घातले असल्यामुळे जगभरातील नागरिक हैराण आहेत, अशा परिस्थितीत या साथ रोगावर लसीकरण करून उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून प्रा. आ. केंद्र गंगामसला अंतर्गत येणाऱ्या मोठेवाडी गावात लसीकरण मोहीम राबवण्यात आली.

याप्रसंगी ग्रामसेवक आनंद सिरसट, रामेश्वर यादव, सर्जेराव जाधव, गणेश सर्जे, तुकाराम रासवे व गावातील नागरिकांची उपस्थिती होती. गावातील २०० नागरिकांनी लसीकरण करून घेतले. यावेळी लसीकरण पथकाने लसीकरणाची माहिती देऊन नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करून लसीकरण विषयी जनजागृती केली. हे लसीकरण यशस्वी होण्यासाठी प्रा. आ. केंद्रातील सिस्टर शिवकन्या शिंदे,आशा वर्कर उर्मिला मनसुके,सीता बोरकर यांनी परिश्रम घेतले.

210821\5531save_20210821_175446_14.jpg

Web Title: Corona vaccination of 200 citizens in Mothewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.