कोरोना लसीकरण, बीड पुन्हा राज्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:21 AM2021-02-05T08:21:02+5:302021-02-05T08:21:02+5:30
फोटो क्रमांक - 28BEDP-१६ - कोरोना लस घेताना नोडल ऑफिसर डॉ. संजय कदम सोमनाथ खताळ बीड : कोरोना लसीकरणात ...
फोटो क्रमांक - 28BEDP-१६ - कोरोना लस घेताना नोडल ऑफिसर डॉ. संजय कदम
सोमनाथ खताळ
बीड : कोरोना लसीकरणात बीड जिल्ह्याने गुरुवारीही दबदबा कायम ठेवत ११० टक्के काम पूर्ण करून राज्यात अव्वल स्थान पटकावले. तसेच गुरुवारी दिवसभरात राज्यात ५४ हजार उद्दिष्टांपैकी ३३ हजार लाभार्थ्यांना लस टोचण्यात आली.
कोरोनाकाळात सर्वात पुढे होऊन काम केल्याने कोव्हीशिल्ड लस देण्यात आरेाग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले. राज्यात २८४ वरून ५३१ केंद्र वाढविण्यात आले. याठिकाणी ५४ हजार १९ उद्दिष्ट ठेवण्यात आल होते. पैकी राज्यात ३३ हजार ३२६ लोकांनी लस घेतली. याची टक्केवारी ६१.७ एवढी आहे. तर बीड जिल्ह्यातील ९ केंद्रांवर ९०० उद्दिष्ट ओलांडून ९९१ लोकांना लस टोचण्यात आली. सर्वात कमी लसीकरण नागपूरचे झाले असून त्यापाठोपाठ औरंगाबादचा क्रमांक लागतो.
बीडमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, नोडल ऑफिसर डॉ.संजय कदम, डॉ.बाबासाहेब ढाकणे आदींकडून याचे योग्य नियोजन केले जात आहे. तसेच तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारीही प्रत्येकाला विश्वास देत लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे.
कोट
जिल्ह्यात गुरुवारी ११० टक्के लसीकरण झाले. राज्यात अव्वल असल्याने अभिमान आहे. सर्व टीम या मोहिमेत परिश्रम घेत आहेत. अव्वल स्थान कायम ठेवून लसीकरण सर्वात अगोदर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू.
डॉ.आर.बी.पवार
जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड
असे झाले राज्यात लसीकरण
राज्यातील बीड जिल्ह्यात ११० टक्के लसीकरण झाले. त्यानंतर अहमदनगर ५७.८ टक्के, अकोला ८४.२, अमरावती ८३.१, औरंगाबाद ३३.८, भंडारा ५८.४, बुलढाणा ४४.४, चंद्रपूर ६६.६, धुळे १००.९, गडचिरोली ८२.३, गोंदिया ८५.२, हिंगोली ७६.४, जळगाव ५४.२, जालना ८६.८, कोल्हापूर ६३.४, लातूर ९१.६, मुंबई ५२.३, मुंबई उपनगर ५१.७, नागपूर २५.७, नांदेड ९२.७, नंदुरबार १२.९, नाशिक ६३.१, उस्मानाबाद ७८.४, पालघर ९५.५, परभणी ४३, पुणे ५१.४, रायगड ७६.६, रत्नागिरी ३३.९, सांगली ५४.१, सातारा ८९.१, सिंधुदुर्ग ९२.७, सोलापूर ३९, ठाणे ७८.७, वर्धा ६०.९, वाशिम ५७.६, यवतमाळ ५३.१ यांचा क्रमांक लागतो.