कोरोना लसीकरण मोहिम, आता पर्यंत केवळ ९२ लस गेल्या वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:30 AM2021-01-22T04:30:45+5:302021-01-22T04:30:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : राज्यासह जिल्हाभरात १६ जानेवारीपासून आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोराेना लस देणे सुरू केले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : राज्यासह जिल्हाभरात १६ जानेवारीपासून आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोराेना लस देणे सुरू केले आहे. यात आतापर्यंत ९५० लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. यातील ५५० अद्यापही गैरहजर आहेत. या सर्वांना लस देताना आतापर्यंत केवळ ९२ लस वाया गेल्या आहेत. एकूण लसच्या १० टक्के लस वाया जातात, असे गृहीत धरले जाते. परंतू बीडमध्ये याची टक्केवारी केवळ १.१ असल्याने दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात बीड जिल्हा रूग्णालयासह आष्टी, अंबाजोगाई, परळी आणि गेवराईत हे लसीकरण केले जात आहे. जिल्ह्याला १७ हजार ६६४० लस प्राप्त झाल्या आहेत. ८ हजार ८८० लोकांना ही लस पहिल्या टप्यात दिली जाणार आहे. दुसऱ्या टप्यात उर्वरित लाभार्थ्यांसह फ्रंट लाईन सर्व विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार असल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
घाबरू नका
n लस दिल्यानंतर काहींना ताप येणे, उलट्या-मळमळ असे लक्षणे आढळत आहेत.
n त्यामुळे काही लाेकांमध्ये भितीचे वातावरण आहे. लस घ्यावी की नाही, याबाबत ते द्विधा मनस्थितीत आहेत.
n परंतु असे लक्षणे आढळत असतात. त्यात घाबरण्यासारखे काहीच नाही. सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे.
एका बाटलीत १० डोस
लसीच्या एका बाटलीतून दहा जणांना डोस देता येतो. ही बाटली काढल्यानंतर चार तासांत ती वापरणे आवश्यक असते. तसेच डोस भरतानादेखील काही प्रमाणात लस वाया जाण्याची शक्यता असते. साधारण १० टक्के डोस वेस्टेज जातात.