कोरोना लसीकरण मोहीम, आतापर्यंत केवळ ९२ लसी गेल्या वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:34 AM2021-01-23T04:34:39+5:302021-01-23T04:34:39+5:30
तीन दिवसांत १५०० पैकी ९५० लाभार्थ्यांना लस, ५५० गैरहजर लोकमत न्यूज नेटवर्क बीड : राज्यासह जिल्हाभरात १६ जानेवारीपासून आरोग्य ...
तीन दिवसांत १५०० पैकी ९५० लाभार्थ्यांना लस, ५५० गैरहजर
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : राज्यासह जिल्हाभरात १६ जानेवारीपासून आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोराेना लस देणे सुरू केले आहे. यात आतापर्यंत ९५० लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. यातील ५५० अद्यापही गैरहजर आहेत. या सर्वांना लस देताना आतापर्यंत केवळ ९२ लसी वाया गेल्या आहेत. एकूण लसीच्या १० टक्के लसी वाया जातात, असे गृहीत धरले जाते. परंतु, बीडमध्ये याची टक्केवारी केवळ १.१ असल्याने दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात बीड जिल्हा रुग्णालयासह आष्टी, अंबाजोगाई, परळी आणि गेवराईत हे लसीकरण केले जात आहे. जिल्ह्याला १७ हजार ६६४० लसी प्राप्त झाल्या आहेत. आठ हजार ८८० लोकांना ही लस पहिल्या टप्प्यात दिली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित लाभार्थ्यांसह फ्रंट लाइन सर्व विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
घाबरू नका
n लस दिल्यानंतर काहींना ताप येणे, उलट्या-मळमळ अशी लक्षणे आढळत आहेत.
n त्यामुळे काही लाेकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लस घ्यावी की नाही, याबाबत ते द्विधा मन:स्थितीत आहेत.
n परंतु अशी लक्षणे आढळत असतात. त्यात घाबरण्यासारखे काहीच नाही. सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे.
एका बाटलीत १० डोस
लसीच्या एका बाटलीतून १० जणांना डोस देता येतो. ही बाटली काढल्यानंतर चार तासांत ती वापरणे आवश्यक असते. तसेच डोस भरतानादेखील काही प्रमाणात लस वाया जाण्याची शक्यता असते. साधारण १० टक्के डोस वेस्टेज जातात.