परळी उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:28 AM2021-01-17T04:28:34+5:302021-01-17T04:28:34+5:30

: कोरोना विषाणुवरील लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनेश कुरमे यांनी पहिली लस ...

Corona vaccination at Parli Sub-District Hospital | परळी उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरण

परळी उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरण

Next

: कोरोना विषाणुवरील लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनेश कुरमे यांनी पहिली लस घेऊन सुरुवात केली.

देशात शनिवारी सुरुवात झाली. या पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील डॉक्टरसह कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनेश कुरमे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे, लसीकरण मोहिमेचे प्रमुख डॉ. वैभव डुबे यांनी स्वतः लस घेऊन शनिवारी सकाळी १०.४० च्या सुमारास सुरुवात करण्यात आली. पहिली लस परिचारिका वनश्री जाधव यांनी दिली. तालुक्यातील १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या दिवशी लस देण्यात येणार आहे. येथील लसीकरण मोहिमेत डॉ. संजय गीत्ते, डॉ. अर्शद शेख, शिक्षक ए.झेड. शेख, परिचारिका वनश्री जाधव, एच.जी. सय्यद, मंगल गीत्ते, ज्योती जगतकर, नीता मगरे, सिराम आदी कर्मचारी सहभागी झाले आहेत. पहिली लस घेतल्यानंतर डॉ. कुरमे यांनी सांगितले की, मी तालुक्यातील पहिली लस घेतली. मला कोणताही त्रास झाला नाही. सर्व कर्मचाऱ्यांनी ही लस घ्यावी. घाबरून जाऊ नये. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे यांनी सांगितले की, कोरोना प्रतिबंधक लस मी घेतली. मला कोणताही त्रास झाला नाही. तालुक्यातील सर्व सरकारी, खाजगी आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी ही लस घ्यावी, यामध्ये कोणतेही साइड इफेक्ट्स होत नाहीत.

Web Title: Corona vaccination at Parli Sub-District Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.