वडवणीत ४८३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:36 AM2021-02-09T04:36:23+5:302021-02-09T04:36:23+5:30

: सोमवारपासून शहर व तालुक्यातील ४८३ खासगी तसेच शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यास सुरुवात केल्याची माहिती तालुका आरोग्य ...

Corona vaccine for 483 employees in Wadwani | वडवणीत ४८३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस

वडवणीत ४८३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस

Next

: सोमवारपासून शहर व तालुक्यातील ४८३ खासगी तसेच शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यास सुरुवात केल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मधुकर घुबडे यांनी दिली.

आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोना रुग्णांशी जवळून संपर्क येत असल्याने राज्य व केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे पहिल्या टप्प्यात ४८३ आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. यासाठी तयार केलेल्या पथकात १ व्हॅक्सिनेटर (प्रत्यक्ष लस देणारा) सोबत ४ सहकारी असणार आहेत. तालुक्यातील ज्या शासकीय आरोग्य कर्मचारी व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोविड अ‍ॅपवर लसीकरणासाठी नोंदणी केली होती, या सर्व कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यात येणार आहे. दररोज १०० जणांना कोरोनाची लस देण्यात येणार असून पाच ते सहा दिवसांच्या कालावधीत वडवणी तालुक्यातील कोरोनाचा लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात वडवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात एक हजार डोस प्राप्त झाले असून कोरोनाची कोव्हिशिल्ड लस ही पूर्णपणे सुरक्षित असून कोरोना लस घेऊन कोरोनामुक्त होण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. एम.बी. घुबडे यांनी केले. तर प्रथम लस लाभार्थी छाया नानेकर म्हणाल्या की, कोविड लस ही पूर्णपणे सुरक्षित असून मला कुठल्याही प्रकारे त्रास जाणवला नाही. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी लस घेऊन सुरक्षित व्हावे.

Web Title: Corona vaccine for 483 employees in Wadwani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.