Corona virus : इस्लामपूरमधून आलेल्या ६ मजूरांसह ३२ जण क्वारटाईनमध्ये दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 11:56 AM2020-03-29T11:56:09+5:302020-03-29T12:00:43+5:30

14 दिवस त्यांची रोज तपासणी करण्यात येणार आहे

Corona virus : 32 Quarantine with 6 laborers coming from Islampur | Corona virus : इस्लामपूरमधून आलेल्या ६ मजूरांसह ३२ जण क्वारटाईनमध्ये दाखल

Corona virus : इस्लामपूरमधून आलेल्या ६ मजूरांसह ३२ जण क्वारटाईनमध्ये दाखल

Next

किल्लेधारूर :  इस्लामपूर येथून किल्लेधारूर मध्ये आलेल्या ६ ऊसतोड मजूरांसह ३२ जनांना शनिवारी मध्यरात्री सतर्क असलेल्या आरोग्य विभागाने किल्लेधारूरच्या क्वारटाईन मध्ये ठेवण्यात आले आहे. त्याच्या वर करडी नजर ठेवण्यात येत असून 14 दिवस त्यांच्या आरोग्याची रोज तपासणी केली जाणार आहे.

        काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे एकाच कुटुंबातील तब्बल 29 जणांना कोरोना विषाणू ची लागण झाल्याने राज्यात खळबळ माजली होती. याच इस्लामपूर मधून नागरिक शनिवारी आपल्या  गावी परतण्यासाठी किल्लेधारूर तालुक्यात दाखल झाले. याची माहिती आरोग्य विभागाला मिळताच मोठ्या शर्थीने या नागरिकांशी संपर्क करून सर्व नागरिकांना मध्यरात्री एक वाजता किल्लेधारूर तेथे सज्ज ठेवण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या सर्व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. त्याची रोज आरोग्य तपासणी केली जाणार आहे 14 दिवस हे नागरिक विलगीकरण कक्षात राहणार आहेत. हे सर्व ऊस तोड कामगार असून तालुक्यातील खोडस येथील एकाच कुटूंबातील ३ व संगम येथील एका कुटुंबातील तीन व्यक्तींचा समावेश आहे. खोडस येथील तिघांचा इतर व्यक्तींशी संबंध आल्याने अशा २६ लोकांनाही विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असल्याची माहिती डॉ. चेतन आदमाने यांनी दिली.

Web Title: Corona virus : 32 Quarantine with 6 laborers coming from Islampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.