corona virus : रेमडेसिवीरच्या अफरातफरिचा आरोप करणाऱ्याचा बीडच्या जिल्हा रूग्णालयात आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 03:41 PM2021-04-26T15:41:04+5:302021-04-26T15:43:34+5:30
दीपक थोरात यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या अफरातफर झाल्याचा आरोप करीत पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती
बीड : येथील जिल्हा रूग्णालयातील अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूखदेव राठोड यांच्या कक्षासमोर सामाजिक कार्यकर्ते दीपक थोरात यांनी ॲसीड प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी धाव घेत त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन रूग्णालयात दाखल केले.
चार दिवसांपूर्वी दीपक थोरात यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या अफरातफर झाल्याचा आरोप करीत पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतद दोन दिवसानंतर दोघा जणांनी थोरात यांना धमकावले होते. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद झाला होता. माझ्या अंगावर माणसे का पाठवतात, असे म्हणत थोरात यांनी सोमवारी आत्मदहनाचा प्रयत्न केला.
यावर अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राठोड म्हणाले, धमकी प्रकरणाबाबत मला काहीच माहिती नाही. संबंधिताने आपले म्हणणे योग्य पद्धतीने व कायदेशीर बाजूने मांडणे गरजेचे आहे. झालेले आरोप खोटे आहेत.