Corona Virus In Beed : लिंबुटा ग्रामस्थांची कोरोनाविरुद्ध खबरदारी; बाहेरच्या नागरिकांना केली गावबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 01:59 PM2020-03-27T13:59:42+5:302020-03-27T14:00:11+5:30
बाहेर गावाहून नागरिकांना गावात प्रवेश बंदी
- संजय खाकरे
परळी : कोरोनाच्या धास्तीने परळी तालुक्यातील गोपीनाथगडा समोरील लिंबुटा येथे बाहेरगावहून येऊन राहणाऱ्या लोकांसाठी गुरुवारी गाव बंदी केली आहे. गावात येणाऱ्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दोन बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. लिंबुटा गावातील 50 युवकांच्या पुढाकाराने बाहेरच्यासाठी ही गावबंदी करण्यात आली असल्याचे गावातील सामाजिक कार्यकर्ते ,ग्रामपंचायत सदस्य मोहन मुंडे यांनी सांगितले,
परळी -बीड राज्यरस्त्यावरील गोपीनाथगडा जवळ लिंबुटा हे चौदाशे पन्नास लोकसंख्येचे गाव आहे .राज्यातील कोरोना च्या पार्श्वभूमीवर या गावात पुणे, औरंगाबाद मुंबई येथून नौकरी व व्यवसायात असलेले गावचं 90 लोक गेल्या काही दिवसात आले आहेत त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे . गेल्या दोन दिवसापासून जे गावचे लोक नाहीत ते सुद्धा लिंबुटा येथे येऊ लागल्याची कुंणकुण गावातील लोकांना लागताच गावाच्या कमानीजवळ बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत अन्य मार्गाने ही बाहेरच्यांना येण्यास मज्जाव केला जाणार असल्याचे ही सांगण्यात आले,गावातील पण बाहेर गावी आहेत त्यांना तपासणी करूनच गावात प्रवेश दिला जाणार आहे
मौजे लिंबुटा गावाची सादग्राम निर्मिती प्रकल्प समिती,लिंबुटाच्या माध्यमातून व ग्रामस्थांच्या सहकार्यातून सादग्राम निर्मिती कडे (आदर्श गाव)वाटचाल सुरू आहे. वृक्ष संवर्धन,दर १५ दिवसातून एकदा लोकसहभागातून ग्रामस्वच्छता,यासह शिक्षण,आरोग्य,शेती व पर्यावरण, रोजगार व कौशल्ये विकास आणि वृद्धसेवा या पाच विषयावर काम जून 2019 पासून सुरु आहे अशा आदर्श गावात आज बाहेरच्याना गावबंदी केली आहे