corona virus : बीडच्या ‘दुबई रिटर्न’ तिघांचेही अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 11:19 AM2020-03-14T11:19:32+5:302020-03-14T11:21:42+5:30

अहवाल प्राप्त निगेटिव्ह असून अफवांवर विश्वास ठेऊ नका

corona virus: Beed's 'Dubai Return' trio report negative | corona virus : बीडच्या ‘दुबई रिटर्न’ तिघांचेही अहवाल निगेटिव्ह

corona virus : बीडच्या ‘दुबई रिटर्न’ तिघांचेही अहवाल निगेटिव्ह

Next
ठळक मुद्दे आरोग्य विभागाने सोडला सुटकेचा श्वास

बीड : पुण्यातील संशयीत कोरोनाग्रस्त रुग्णांच्या विमानात बीडच्या तिघांनी प्रवास केल्याचे समोर आले होते. या तिघांचीही तपासणी केली होती. याचा अहवाल शनिवारी सकाळीच प्राप्त झाला असून तिघांचेही रिपोर्टस निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने मोकळा श्वास घेतला असून अफवांवर विश्वास न ठेवता काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे. 

बीड शहरातील रहिवाशी असलेले एक कुटूंब दुबईला पर्यटनासाठी गेले होते. १ मार्च रोजी ते परतले. ज्या विमानातून ते महाराष्ट्रात आले, त्याच विमानात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याचे समोर आले होते. त्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागाने त्यांची नावे जाहिर करीत बीडच्या आरोग्य विभागाला सतर्कतेच्या सुचना केल्या. त्या तिघांचीही भेट घेत तपासण्या केल्या. याचा अहवाल आता बीड आरोग्य विभागाल प्राप्त झाला असून तिघांचेही अहवाल निगेटिव्ह असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी सांगितले. नागरिकांनी कोरोना आजाराबाबत पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. सर्वांनी स्वता:ची काळजी घ्यावी. घाबरून जावू नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी केले आहे.

Web Title: corona virus: Beed's 'Dubai Return' trio report negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.