कोरोना व्हायरस; घाबरू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका, गर्दीची ठिकाणे टाळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 11:27 PM2020-03-05T23:27:08+5:302020-03-05T23:27:35+5:30

कोरोना हा संसर्गजन्य आजाराबाबत काळजी घेण्यासह आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सुचना मुख्य सचिव व आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांनी दिल्या आहेत. गुरूवारी दुपारी त्यांनी व्हीसीद्वारे या सूचना केल्या. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून काळजी घेण्याबाबत आवाहनही जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे.

Corona virus; Don't panic, don't believe the rumors, avoid crowded places! | कोरोना व्हायरस; घाबरू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका, गर्दीची ठिकाणे टाळा !

कोरोना व्हायरस; घाबरू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका, गर्दीची ठिकाणे टाळा !

Next
ठळक मुद्देबीड जिल्हा आरोग्य विभागाचे नागरिकांना आवाहन : मुख्य सचिव, प्रधान सचिवांनी घेतला व्हीसीद्वारे राज्याचा आढावा

बीड : कोरोना हा संसर्गजन्य आजाराबाबत काळजी घेण्यासह आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सुचना मुख्य सचिव व आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांनी दिल्या आहेत. गुरूवारी दुपारी त्यांनी व्हीसीद्वारे या सूचना केल्या. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून काळजी घेण्याबाबत आवाहनही जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे.
कोरोना आजाराचे रुग्ण चिनमध्ये आढळून आलेले आहेत. अनेकांचा मृत्यूही झाला आहे. हा आजार आंतरराष्ट्रीय दळवणवळणाद्वारे इतर देशांमध्ये पसरत आहे. भारतातही या आजाराचे काही रुग्ण आढळून आले आहेत. त्यानतंर देशासह राज्य आरोग्य यंत्रणा सज्ज झाली. दक्षता व उपाययोजनांबाबत रोज आढावा घेतला जात आहे. गुरूवारीही दुपारी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता व आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी राज्याचे सर्व आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महापालिका आयुक्त, मुख्याधिकारी यांची व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. अद्यापतरी या आजारावर औषधोपचार उपलब्ध नसला तरी लक्षणांनुसार उपचार करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. बीडच्या बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.बाबसाहेब ढाकणे, साथरोग अधिकारी डॉ.पिंगळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी यांची उपस्थिती होती.
परळीत वैद्यनाथ देवस्थानकडून विशेष खबरदारी
परळी : देशातील १२ ज्योतिलिंर्गापैकी एक येथील श्री प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी राज्य व परराज्यातून भाविक येत आहेत. परदेशात लागण झालेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टने विशेष खबरदारी घेतली आहे
गुरूवारी स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना मंदिराचे सचिव राजेश देशमुख यांनी सूचना दिल्या आहेत. दर दोन तासाला मंदिराच्या गाभाºयात स्वच्छता करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच क्लीनिंग मशीनने स्वच्छता करून मंदिर परिसर स्वच्छ ठेवला जात आहे. राज्य व परराज्यातील भाविक येथे दर्शनासाठी येत असल्याने प्रत्येक भक्ताने तोंडाला मास्क किंवा स्कार्फ लावावा असे आवाहनही श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
त्याचबरोबर जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालय यांना एक पत्र पाठवून आरोग्य यंत्रणा वैद्यनाथ मंदिरात सतर्क करण्याच्या दृष्टीने कळविण्यात येणार असल्याचेही मंडळाचे सचिव राजेश देशमुख यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
‘स्वाराती’मध्ये स्वतंत्र कक्षाची स्थापना
अंबाजोगाई : चीन येथे पसरलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात भितीचे वातावरण पसरले आहे. या व्हायरसचे रूग्ण भारतात सापडल्यानंतर आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई येथील स्वाराती शासकिय रूग्णालयातील यंत्रणा सज्ज झाली आहे.
व्हायरस पसरल्यानंतर महिनाभरापूर्वीच येथील रूग्णालयाच्या वतीने वेगळा वार्ड उभा करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसने ग्रस्त रूग्णास तात्काळ उपचार मिळण्यासाठी प्राथमिक उपचाराचे सर्व साहित्य या वार्डात उपलब्ध आहे.
यासाठी नऊ डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली असून, डॉ. सिध्देश्वर बिराजदार या समितीचे अध्यक्ष आहेत तर डॉ. संभाजी चाटे सचिव आहेत. उपचार करतांना लागणारे एन- ९५, थ्री लेयर तसेच संपूर्ण शरीर झाकण्याचे बॉडी सुट मास्क उपलब्ध असल्याचे डॉ. बिराजदार यांनी सांगीतले. चीन व दुबई येथून आलेल्या नागरिकांनी कोणताही त्रास जाणवत असेल तर त्वरित रूग्णालयाशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Corona virus; Don't panic, don't believe the rumors, avoid crowded places!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.