corona virus : विनामास्क फिरल्याने दंड सुनावला; संतप्त तरुणाने तहसीलदार, मुख्याधिकाऱ्यांना केली शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 07:03 PM2021-05-03T19:03:08+5:302021-05-03T19:14:51+5:30

corona virus : विनाकारण फिरणाऱ्या लोकांची जबरदस्तीने अँटीजन चाचणी करण्याच्या मोहिमेला सोमवारपासून बीड जिल्ह्यात सुरूवात झाली.

corona virus : Fined for walking around without a mask; The angry youth insulted the tehsildar and the chief minister | corona virus : विनामास्क फिरल्याने दंड सुनावला; संतप्त तरुणाने तहसीलदार, मुख्याधिकाऱ्यांना केली शिवीगाळ

corona virus : विनामास्क फिरल्याने दंड सुनावला; संतप्त तरुणाने तहसीलदार, मुख्याधिकाऱ्यांना केली शिवीगाळ

Next
ठळक मुद्देविनामास्क फिरणाऱ्या तरूणाला दंडाची आणि अँटीजन टेस्टची केली होती सूचना 

अंबाजोगाई : मास्क न लावता फिरणाऱ्या दुचाकीस्वाराला पथकाने अडविले आणि अँटीजेन चाचणी व दंडाची सूचना केली. यामुळे संतापलेल्या तरूणाने पथकातील अधिकाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत चाचणीला विरोध केला. ही घटना अंबाजोगाईतील सावरकर चौकात सोमवारी (दि.०३) सकाळी घडली.

विनाकारण फिरणाऱ्या लोकांची जबरदस्तीने अँटीजन चाचणी करण्याच्या मोहिमेला सोमवारपासून बीड जिल्ह्यात सुरूवात झाली. यासाठी अंबाजोगाई शहरात पाच पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी पावणेआठच्या सुमारास अंबाजोगाई बसस्थानकासमोर वेणुताई महिला महाविद्यालयासमोर तहसीलदार विपीन पाटील, मुख्याधिकारी अशोक साबळे, तालुका आरोग्य अधिकारी बालासाहेब लोमटे, महसूल व न.प.चे कर्मचारी, पोलीस हे अँटीजन टेस्ट ड्राईव्हची कार्यवाही करत होते. यावेळी प्रविण राजाभाऊ शेप (रा. शेपवाडी, ता. अंबाजोगाई) हा तरूण विनामास्क त्याच्या दुचाकीवरून (एमएच २० बीबी ९२७३) सावरकर चौकाकडून येत होता. 

पथकाने त्याला अडवून अँटीजन चाचणी आणि विनामास्क असल्याने दंड भरण्याबाबत सुचना केली. त्यामुळे संतापलेल्या प्रविणने सर्व अधिकाऱ्यांना उद्देशून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आणि अँटीजन चाचणीला विरोध करत दहशत निर्माण केली. याप्रकरणी रमेश भानुदास सोनकांबळे यांच्या फिर्यादीवरून प्रविण शेप याच्यावर कलम ३५३, ५०४, १८८ सह आपत्कालीन व्यवस्था कायद्यान्वये अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

२३५ जणांच्या अ‍ॅन्टिजन टेस्ट,११ पॉझिटिव्ह 
दरम्यान, शहरात विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍या नागरिकांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. सोमवारी दिवसभरात सहा पथकांनी  रस्त्यावर विनाकारण फिरणार्‍या २३५ जणांच्या अ‍ॅन्टिजन टेस्ट केल्या यात ११ जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. तर मास्क न वापरणे विविध नियमांचे पालन न करणे अशा विविध नागरिकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाई पोटी एकाच दिवसात ५५ हजार ५०० रूपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.

Web Title: corona virus : Fined for walking around without a mask; The angry youth insulted the tehsildar and the chief minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.