कोरोना वायरस; डोईठाणचा सैलानी बाबा यात्रोत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 11:21 PM2020-03-11T23:21:55+5:302020-03-11T23:22:29+5:30
चीनच्या कोरोना वायरसचे लोन महाराष्ट्रात आल्याने ग्रामीण भागात देखील नागरिक भयभीत होऊ लागले आहेत. त्यानुषंगाने डोईठाण येथील सैलानी बाबाचा यात्रात्सोव यंदाच्या वर्षी या भीतीपोटी रद्द करण्यात आला आहे.
कडा : चीनच्या कोरोना वायरसचे लोन महाराष्ट्रात आल्याने ग्रामीण भागात देखील नागरिक भयभीत होऊ लागले आहेत. त्यानुषंगाने डोईठाण येथील सैलानी बाबाचा यात्रात्सोव यंदाच्या वर्षी या भीतीपोटी रद्द करण्यात आला आहे. नुकतीच ग्रामस्थांनी यासाठी बैठक घेऊन एकमुखी निर्णय घेतला आहे.
आष्टी तालुक्यातील डोईठाण येथील ग्रामदैवत असलेल्या सैलानी बाबा याचा यात्रोत्सव आहे. यासाठी मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण, डोंबिवली याठिकाणी उदरनिर्वाह भागविण्यासाठी गेलेले भाविक बहुसंख्येने येतात. यंदाच्या वर्षी कोरोना व्हायरस महाराष्ट्रात आल्याने याचा धोका निर्माण होऊ नये यासाठी नुकतीच येथील ग्रामस्थ यांनी बैठक घेतली. या विषयावर चर्चा करून होणारी यात्रा रद्द करून पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या बैठकीला युवराज तरटे, नवनाथ तरटे, लक्ष्मण खाडे, धनंजय तरटे, पुजारी चिन्नू फुलमाळी, गंगाराम फुलमाळी, यल्लाप्पा फुलमाळी, अली फुलमाळी, सिन्नाप्पा फुलमाळी, बीट अंमलदार कैलास गुजर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.