कोरोनाची साथ कमी झाली; आता डेंग्यू, मलेरियाची भीती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:22 AM2021-06-10T04:22:51+5:302021-06-10T04:22:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने दिलासा मिळत आहे. असे असले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने दिलासा मिळत आहे. असे असले तरी आता पावसाळ्याचे दिवस आल्याने साथरोग पसरण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्याने ठिकठिकाणी पाणी साचते. त्यामुळे डासांची उत्पत्ती होते. तसेच नागरिकही पाणी साठ्यांची वेळेवर स्वच्छता करत नसल्याने डास उत्पत्ती होते. यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनियासारख्या आजारांना निमंत्रण मिळते. हे टाळण्यासाठी आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करून साचलेले पाणी वाहते करावे. तसेच पाणीसाठे स्वच्छ करून एक दिवस कोरडा पाळण्याची काळजी घ्यावी. यामुळे साथरोगांना आळा बसेल.
आरोग्य विभागाकडून प्रत्येक महिन्याला सर्वेक्षण केले जात आहे. मागील काही वर्षांत बाधितांचा आकडा कमी झाला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांच्या नेतृत्वाखाली हा विभाग काम करतो.
ही घ्या काळजी
n आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळणे, सात दिवसाला प्रत्येकाला भांडी कोरडी करून स्वच्छ करणे.
n कूलर व फ्रीजच्या पाठीमागे असलेले पाणी सात दिवसाला बदलणे. घराजवळ साचलेले पाणी वाहते करणे.
n स्लॅबवर असलेले टायर, नारळाच्या करवंट्या, प्लास्टिक, फुटलेले कूलर यामध्ये पाणी जमा होऊ न देणे. गप्पी मासे पाळणे.
डबक्यांमध्ये गप्पी मासे
जिल्ह्यात २१९ गप्पी मासे पैदास केंद्रे आहेत. तसेच हंगामी डासोत्पत्ती स्थानांची संख्या १ हजार ३३७ एवढी आहे. त्यानंतर कायम डासोत्पत्ती स्थाने ३१९ असल्याचे हिवताप कार्यालयाकडून सांगण्यात आले.
वर्षात तीन ते चार वेळा सर्वेक्षण केले जाते. ज्या ठिकाणी पाणी साचलेले दिसते तेथे गप्पी मासे सोडले जातात. पावसाळ्यात ही कारवाई मोठ्या प्रमाणात केली जाते. हिवताप कार्यालय यासाठी परिश्रम घेते.
सर्वेक्षण करून पाणी नमुने तपासले जातात. दूषित पाणी साठ्यात गप्पी मासे साेडले जातात. दिवसेंदिवस दूषित पाणीसाठे आणि रुग्णांची संख्या कमी होत असल्याने दिलासा मिळत आहे. तसेच जनजागृतीचाही मोठा फायदा होत असल्याचे दिसते.
डॉ.मिर्झा साजीद बेग
- हिवताप अधिकारी
===Photopath===
090621\09_2_bed_4_09062021_14.jpeg
===Caption===
डॉ.मिर्झा बेग