कोरोनाचा आकडा खाली आला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:35 AM2021-05-09T04:35:21+5:302021-05-09T04:35:21+5:30
शिरूर कासार : तालुक्यात शनिवारी कोरोनाचा आकडा पाचने खाली आला. गेले चार दिवसांपासून बाधित रुग्णसंख्येत घट होत ...
शिरूर कासार : तालुक्यात शनिवारी कोरोनाचा आकडा पाचने खाली आला. गेले चार दिवसांपासून बाधित रुग्णसंख्येत घट होत असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे. मात्र, चिंता मिटली असे न समजता हा आकडा शून्यावर आणण्यासाठी नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
लाॅकडाऊनमुळे गावपण हरवले
शिरूर कासार : सध्या लाॅकडाऊन असल्याने शहराला बकाल अवस्था प्राप्त झाली असून, रस्त्यावर माणूस दिसत नाही, दुकाने बंद असल्याने सारा व्यवहार ठप्प झाला आहे.
कालिकादेवी मंदिरात आराधना यंदाही बंदच
शिरूर कासार : चैत्र महिना आला की येथील कालिका देवी मंदिरात नित्याने आराधना होत असते; मात्र कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षीदेखील आराधना झालेल्या नसल्याने मंदिरातील ढक्कू भाकरीच्या बेताला मुकावे लागले.
बँडचा आवाज झाला बंद
शिरूर कासार : सतत या ना कारणाने बँड, स्पिकरचा आवाज ऐकू येत होता; मात्र यावर्षी लाॅकडाऊन आणि त्याची नियमावली कडक असल्याने लग्नासह अन्य कार्यक्रमात वाजंत्रीचा आवाजच बंद झाल्याचे दिसून येते. परिणामी या कलाकारांना प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.
पंधरा दिवस उलटून गेले तरी नळ कोरडेच
शिरूर कासार : तालुक्याचे ठिकाण असलेले आणि शहरही उपाधी लागली असली तरी पिण्याच्या पाण्याची व्याधी संपता संपत नाही. तब्बल पंधरा दिवस उलटून गेले तरी नळाला पाणीच येत नसल्याने भटकंती सुरू आहे.