कोरोनाचे नियम पायदळी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:47 AM2021-02-26T04:47:15+5:302021-02-26T04:47:15+5:30

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर आणि तालुक्यात कोविड रुग्णांची संख्या सतत वाढत असताना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करण्यात नगर ...

Corona's rule of foot, the fuss of social distance | कोरोनाचे नियम पायदळी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

कोरोनाचे नियम पायदळी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

Next

अंबाजोगाई :

अंबाजोगाई शहर आणि तालुक्यात कोविड रुग्णांची संख्या सतत वाढत असताना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करण्यात नगर परिषद, पोलीस आणि महसूल प्रशासन निष्क्रिय दिसून येत आहे. केवळ रस्त्यावर उभे राहून विनामाक्स फिरणाऱ्यांवर कार्यवाही करण्यापेक्षा शहरात भरणारे आठवडी बाजार, खासगी शिकवणीवर्ग आणि बसमध्ये उसळणारी प्रवाशांची गर्दी रोखण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

अंबाजोगाई शहर आणि तालुक्यात कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असतानाच पोलीस आणि नगर परिषद प्रशासनाकडून केवळ मुख्य रस्त्यावर विनामाक्स फिरणाऱ्या नागरिकांकडून दंडवसुली करण्यात येत आहे. यापेक्षा सर्वाधिक गर्दीच्या ठिकाणाकडे मात्र हे कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहेत.

लॉकडाऊनच्या काळात बंद असलेलले आठवडी बाजार, खासगी शिकवणीवर्ग चालू झाल्यानंतर या दोन्ही ठिकाणी अचानक गर्दी उसळली. शहर व तालुक्यातील घाटनांदूर, लोखंडी सावरगाव व इतर गावांमध्ये भरणाऱ्या आठवडी बाजारात हाऊसफुल्ल गर्दीत सर्व व्यवहार सुरळीत पार पडत आहेत. या आठवडी बाजारात मास्क, सोशल डिस्टसिंग, सॅनिटायझर या नियमांचा पुरता फज्जा उडालेला दिसून येत आहे.

शहरातील सर्व शिकवणीवर्ग हाऊसफुल्ल झाले आहेत. एका-एका वर्गात शंभरांहून अधिक विद्यार्थी बसवत असून सोशल डिस्टनसिंगचा इथे फज्जा उडाला आहे. तर दुसरीकडे "मास्क नाही, प्रवेश नाही" हे स्लोगन लावून प्रवासी वाहतूक सुरू केलेल्या एस. टी. बसेसमध्येही मास्क नसलेल्या प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसेस कोविड नियमांचा फज्जा उडवताना दिसत आहेत. तर नियुक्त केलेल्या जबाबदार कर्मचाऱ्यांकडे मात्र कोविड नियमांची अंमलबजावणी करण्यासाठीचे गांभीर्य दिसत नाही.

===Photopath===

250221\fb_img_1614171715109_14.jpg

Web Title: Corona's rule of foot, the fuss of social distance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.