CoronaVirus : परळीचा सीमेवर १७ ट्रकमधून परतले ३५२ ऊसतोड कामगार, तपासणीनंतर सर्वजण क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 05:44 PM2020-04-17T17:44:07+5:302020-04-17T17:45:39+5:30
तालुक्यातील २२ तांड्यावरील कामगार
परळी -वर्धा येथून शुक्रवारी परळी तालुक्यात परत आलेल्या 22 तांड्यावरील 352 ऊसतोड कामगारांना होम क्वांरटाईन करण्यात आले आहे.
परळी तालुक्यातील विविध तांड्यावर चे ऊस तोड कामगार हे वर्धा जिल्ह्यातील साखर कारखान्यास ऊसतोडीसाठी गेले होते . राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते परळी ला परत आले आहेत सतरा ट्रकमधून परळी शहरातील गंगाखेड फाट्यावर आले. त्यांची या ठिकाणी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी तपासणी केली, त्यांच्यात कोरोना ची कुठलीही लक्षणे आढळून आले नाहीत असे सांगण्यात आले. खबरदारी म्हणून त्यांना 14 दिवसासाठी होम क्वांरटाईन करण्यात आले आहे.
यावेळी परळीचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे ,डॉक्टर मोराळे, डॉ शेख, राहुल शिंदे, डॉ किशोर घुगडे, डॉ पवार गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी तलाटी पलेवाड मॅडम , विविध गावचे ग्रामसेवक व पोलीस आधिकारी उपस्थित होते. दरम्यान, परळी तालुक्यातील सेवा नगर तांडा रूपसिंग तांडा ,मालेवाडी तांडा डाबी तांडा, दारावती तांडा कनेरवाडी यासह 22 तांड्यावरील 352 ऊसतोड कामगार शुक्रवारी परळी तालुक्यात परत आले आहेत