CoronaVirus : कौतुकास्पद ! आईच्या मृत्यूनंतर उत्तरकार्याचा खर्च टाळून मुख्यमंत्री निधीस मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 06:16 PM2020-04-15T18:16:12+5:302020-04-15T18:17:29+5:30
दुःख बाजूला ठेवत कुटुंबाचे कोरोना विरुद्ध लढ्यासाठी योगदान
परळी: कोरोना च्या संकटामुळे लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून आई च्या निधनानंतर गंगापूजनाचा ( गोड जेवणाचा / उत्तर कार्य ) कार्यक्रमाचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड 19 ला देण्याचा निर्णय परळीच्या प्रशांत भास्करराव जोशी व कुटुंबीयांनी घेतला आहे .
येथील गणेशपार विभागातील इंदुबाई भास्करराव जोशी यांचे दि.२ एप्रिल रोजी निधन झाले .त्यांचे चिरंजीव प्रशांत जोशी यांनी आईच्या चौदावा दिवसाचा कार्यक्रम घरच्या घरी करून होणारा खर्च टाळीत 25 हजार रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड 19 ला देण्याचे ठरविले, यास जोशी कुटुंबातील सर्वच सदस्य तयार झाले, प्रशांत जोशी हे सामाजिक न्यायमंत्री व बीड जिल्हाचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी आहेत.
इंदूबाई जोंशी यांचे अचानक निधन झाले आणि जोशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आईच्या निधनास चौवदा दिवस झाले नसले तरी दोन दिवसानंतर घरीबसूनच प्रशांत जोशी यांनी दुःखाचा डोंगर बाजूला असताना ही लोकांच्या आडी अडचणी सोडविणे सुरू केले, आणि कोरोना पार्श्वभूमीवर आई चा गोड जेवणाचा कार्यक्रम न करता घरच्या सदस्याच्या उपस्थित करून होणारा अनावश्यक खर्च टाळला आणि तो मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड 19 ला देण्याचा निर्णय घेतला , बुधवारी परळी चे तहसिलदार विपीन पाटील यांच्या कडे सुपुर्द केला.