CoronaVirus : स्वच्छतेसोबत जनजागृती; घंटागाडयाद्वारे होतेय कचरा संकलनासह कोरोनावर प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 07:10 PM2020-03-31T19:10:02+5:302020-03-31T19:12:47+5:30
अंबाजोगाई नगर परिषदेच्या १८ गाडयांचा यात समावेश
अंबाजोगाई - कोरोना विषाणंूंचा प्रादुर्भाव लक्षात घेता. अंबाजोगाई नगर परिषदेने कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून घंटा गाडीच्या ध्वनिक्षेपणावरून शहरात जनजागृती सुरू केली आहे. कचरा संकलनासोबतच जनजागृती तर दुपारच्या वेळी विविध सूचना देण्याचे काम घंटागाडया करू लागल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई नगर परिषदेने स्वच्छता व जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखणे हे शासनासमोर मोठे आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यासाठी नगर परिषद प्रशासन विविध माध्यमातून जनजागृती व स्वच्छतेचे कार्य करीत आहेत. अंबाजोगाईत १८ घंटागाडया शहरात कचºयाचे संकलन करतात. आता या १८ ही घंटागाडयाच्या माध्यमातून कचरा संकलनाबरोबरच शहरवासियांचे प्रबोधन केले जात आहे. शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये गेलेली घंटागाडी त्या परिसरात थांबून कोरोनाच्या संदर्भातील सर्व सूचनांची माहिती देते. आरोग्यविषयक सल्ले व मार्गदर्शनही या माध्यमातून होते. तसेच ज्यावेळी संचारबंदी शिथिल असते त्यावेळी गर्दीच्या ठिकाणी गर्दी पांगवण्यासाठी नगर परिषद कर्मचाºयांचा मोठा पुढाकार आहे.
सोशल डिस्टन्सबाबत घंटागाडयाच्या माध्यमातून मंडी बाजार, भाजीपाला मार्केट व किराणा दुकान, औषधी दुकान, या दुकानांसमोर जनजागृतीचे काम सुरू आहे. संचारबंदीतही शासनाच्या वेळोवेळी येणाºया सूचना सर्वसामान्यांमध्ये पोहचवण्यासाठी या घंटागाडीची मोठी मदत होऊ लागली आहे.अंबाजोगाई नगर परिषदेच्या वतीने शहरात स्वच्छतेबरोबर जनजागृतीचेही काम सुरू आहे.
शहरातील १८ ही घंटागाडयांवर कर्मचारी शासनाच्या सर्व सूचना नागरिकांपर्यंत थेट पोहचवू लागल्याने जनजागृतीचे काम सोपे झाले आहे. जोपर्यंत लॉकडाऊन आहे. तोपर्यंत ही सुविधा उपलब्ध राहणार आहे. अशी माहिती अंबाजोगाई नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक आनंत वेडे यांनी दिली.