CoronaVirus : अटक करा, जामीन सुद्धा घेणार नाही - आ. सुरेश धस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 01:59 PM2020-04-04T13:59:41+5:302020-04-04T14:01:26+5:30
चुप बैठो नही तो कान काटूंगा या सरकारच्या भूमिकेला मी कायम विरोध करीत राहणार
आष्टी : ऊसतोड मजूरांवर भिगवण-राशीन हद्दीत पोलीसांनी अमानुष मारहाण केल्यानंतर त्यांच्या मदतीला मी गेलो म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल झाला.असले हजारो गुन्हे दाखल करा मी अंगावर झेलायला तयार आहे मला अटक झाली तरी मी यावर जामीन करणार नाही. चुप बैठो नही तो कान काटूंगा या सरकारच्या भूमिकेला मी कायम विरोध करीत राहणार असे टीकास्त्र आमदार सुरेश धस यांनी सरकारवर सोडले. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांचा विमा उतरविला जातो, ऊसतोड कामगारांचा देखील 50 लक्ष रुपयांचा विमा कारखारदारांनी उतरविला पाहिजे अशी मागणीसुद्धा आमदार धस यांनी केली.
यावेळी बोलताना आ.धस यांनी ऊसतोड मजूरांच्या बाबतीत सरकार इसेन्सियल कम्युडिटी अॕक्टनुसार साखर कारखाने सुरु ठेवत आहेत.माञ सद्यस्थितीत कोरोनामुळे संपूर्ण देश लाॕकडाऊन आहे.अशा स्थितीत जर हे मजूर काम करीत आहेत तर त्यांच्या जिविताशीच खेळण्याचा हा प्रकार आहे.शेवटी ते देखील माणसच आहेत.आजच्या दिवशी देखील अनेक कारखाने सुरु आहेत,मग त्या मजूरांमध्ये सोशल डिस्टंट आहे का? एकाएका कारखान्यावर आज हजारो कामगार आहेत ही गोष्ट कोणी लक्षात घेत नाही.केवळ 50 रुपये वाढवून देऊ आणि किराणा देऊन मजूरांची बोळवण करु हा कोणता नियम आहे.
...तर जामीन सुद्धा घेणार नाही
स्व.मुंडे आणि शरद पवार यांच्या लवादामध्ये ऊसतोड मजूरांना घरी सोडण्यापर्यंतची जबाबदारी ही कारखान्यांची होती.अशावेळी हा नियम लागू होत नाही का? तीन तीन जिल्हे ओलांडून हे कामगार परतले मग तिथले प्रशासन काय करत होते,त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे असले हजारो गुन्हे दाखल झाले तरी मी ते अंगावर घ्यायला तयार आहे आणि अटक केले तर मी जामीन सुद्धा करणार नाही म्हणत आ.धस यांनी राज्य सरकारवर टिकेची झोड उठवली.