CoronaVirus : बीड जिल्हा कोरोनामुक्तच; आणखी १० रिपोर्ट निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 08:27 PM2020-04-24T20:27:20+5:302020-04-24T20:29:27+5:30

अंबाजोगाईतून २ व बीडमधून ८ असे १० स्वॅब प्रयोगशाळेत पाठविले होते

CoronaVirus: Beed District Corona free; Another 10 reports are negative | CoronaVirus : बीड जिल्हा कोरोनामुक्तच; आणखी १० रिपोर्ट निगेटिव्ह

CoronaVirus : बीड जिल्हा कोरोनामुक्तच; आणखी १० रिपोर्ट निगेटिव्ह

Next

बीड : आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील रुग्ण कोरोनामुक्त होऊन शुक्रवारी घरी परतला. त्यानंतर जिल्ह्यातून आणखी १० स्वॅबचा रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे बीड जिल्हा कोरोनामुक्तच आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत केवळ एकमेव कोरोनाग्रस्त रुग्ण होता, तोही आता कोरोनामुक्त होऊन घरी परतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा सद्य:स्थितीत शून्य आहे. शुक्रवारी अंबाजोगाईतून २ व बीडमधून ८ असे १० स्वॅब प्रयोगशाळेत पाठविले होते. रात्री ८ वाजता त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातून पाठविलेल्या सर्व १८० स्वॅबचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. ही माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार यांनी दिली.

Web Title: CoronaVirus: Beed District Corona free; Another 10 reports are negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.