coronavirus : बीडचा शुन्य कायम; आणखी १२ स्वॅब निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 05:09 PM2020-05-11T17:09:23+5:302020-05-11T17:09:44+5:30
जिल्ह्यात बीड, अंबाजोगाई, केज आणि परळी येथून सध्या स्वॅब घेण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे
बीड : बीड जिल्ह्यात सध्या एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नाही. त्यामुळे शुन्य कायम आहे. सोमवारी पाठविलेले सर्वच १२ स्वॅबचा रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातून ३४२ स्वॅब घेण्यात आले असून त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात बीड, अंबाजोगाई, केज आणि परळी येथून सध्या स्वॅब घेण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी ही माहिती दिली.
आरोपींमुळे वाढतेय स्वॅबची संख्या
सध्या कारागृह प्रशासनाने प्रत्येक आरोपीची कोरोना स्वॅब तपासणी करूनच कारागृहात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी स्वतंत्र तात्पूरते कारागृह तयार केले आहे. दररोज आरोपींचे स्वॅब घेतले जात असल्योन ही संख्या वाढत आहे.