CoronaVirus : बीडकरांना मोठा दिलासा; ‘त्या’ ९ जणांचे दुसऱ्यांदा पाठविलेले स्वॅब निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 05:37 PM2020-04-11T17:37:16+5:302020-04-11T17:38:57+5:30
अंबाजोगाईत नवीन आलेल्या एका संशयिताचा स्वॅब घेतला.
बीड : बाहेरून आलेल्या आणि संशयीत असलेल्या ९ लोकांचे दुस-यांदा स्वॅब घेण्यात आले होते. ते सुद्धा निगेटिव्ह आले आहेत. आरोग्य विभागाने ही माहिती दिली.
विदेशातून अथवा बाहेर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींना थोडेही लक्षणे जाणवताच अंबाजोगाई आणि बीडच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले जात आहे. यापूर्वीच ज्या लोकांना दाखल केले होते, त्यांचे सात दिवसांनी पुन्हा स्वॅब घेतले जात आहेत. अशाच ९ लोकांचे बीडमध्ये स्वॅब घेण्यात आले तर अंबाजोगाईत नवीन आलेल्या एका संशयिताचा स्वॅब घेतला. याचा अहवाल प्राप्त झाला असून ९ लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर अंबाजोगाईचा अहवाल येणे अद्यापही बाकी आहे. आणखी नव्याने सहा संशयितांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. आतापर्यंत ११८ लोकांचे स्वॅब पाठविले होते. ते सर्व निगेटिव्ह आलेले आहेत.
दरम्यान, आष्टी येथील कोरोना बाधितावर अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचा स्वॅब नगर येथूनच पाठविण्यात आलेला होता. सध्या त्याची प्रकृती ठिक असल्याचे आरोग्य सूत्रांकडून सांगण्यात आले.