coronavirus : देशभरातील बारा ठिकाणी होणाऱ्या कालिका देवीच्या यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 05:44 PM2020-03-18T17:44:50+5:302020-03-18T17:45:47+5:30
यात्रा कालावधी दरम्यान केवळ स्थानिक संस्थानिक विधिवत पूजा करणार
माजलगाव : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा प्रसार व संसर्ग होऊ नये म्हणुन देशभरातील बारा ठिकाणच्या कालिका देवीच्या यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय कासार समाजाचे अध्यक्ष शरद भांडेकर यांनी दिली आहे. याबाबत सर्व ठिकाणच्या संस्थानिकांनी फोनवरून संपर्क करत चर्चा केली.
राज्यातील बोरगाव ता. कळंब, घोटण ता. शेवगाव, कनकशीळ ता. औरंगाबाद, टीटीवी वाडोणा, हेलस ता. मंठा, भुतेगाव ता. जालना, डिग्रस ता. परळी, नेकनुर ता. बीड यासह देशभरात चैत्र महिन्यात कालिका देवीचा यात्रोत्सव दरवर्षी होतो. परंतु देशात कोरोनाचे सावट वाढत असल्याने यावर्षी यात्रोत्सव स्थगित करण्यात येत आहे. मात्र स्थानिक कार्यकारणी मंडळाने त्या दरम्यानची विधीवत पूजा करावी. यामुळे भाविकांनी यात्रेसाठी विविध ठिकाणी यात्रेसाठी जाऊन गर्दी करू नये असे आवाहन अखिल भारतीय कासार मंडळाने केले आहे.
याबाबत बोरगाव कळंब येथून दिनेश अष्टेकर, कासारे नरेंद्र डंबिर, कडूस्कर सर, मारोतीराव विश्वांभर, शिवराज आंदोले, घोटणचे शिवाजीराव गोसावी, अशोकराव पाथरकर, नेकनूरचे शिवाजी काटकर, डाॅ. सोनाजी पाटील, डीग्रसचे गुलाब शेटे, कनकशीळ चे कृष्णाप्पा सरोदे, लासुरचे अॅड. संतोष भुजबळ, टिटवी वाढोनाचे डाॅ. अरूणराव पोफळे, प्रदीप बारस्कर या महाराष्ट्रातील संस्थानिक मंडळासोबत मोबाईल काॅन्फरन्सवर चर्चा करून घेतला असल्याची माहिती अखिल भारतीय कासार समाजाचे अध्यक्ष शरद भांडेकर यांनी दिली आहे.