CoronaVirus : बीडची तटबंदी कोरोनाने भेदली; ९८ निगेटिव्ह अहवालानंतर आढळला पहिला रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 09:01 AM2020-04-08T09:01:30+5:302020-04-08T09:02:11+5:30
नगर लगतच्या आष्टी तालुक्यात आढळला पहिला रुग्ण
बीड/ आष्टी : नगर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेला बीड जिल्ह्यातील एक कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. सध्या त्याच्यावर नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जामखेड येथे आठवड्यापूर्वी जमात मध्ये आलेले दोघे कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्याच लोकांच्या संपर्कात आष्टी तालुक्यातील दोघे आले होते. नगर जवळ असल्याने त्यांना नगर जिल्हा रुग्णालयात सोमवारी दाखल केले होते. त्यांचे स्वॅब तपासणीला पाठविले होते. यातील एकाच अहवाल पॉझिटिव्ह आला असून एकाचा प्रलंबित आहे.
दरम्यान, ज्या गावातील हा रुग्ण आहे, ते गाव व 3 किलो मीटरचा परिसर सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले आहेत. बीड जिल्ह्यात आतापर्यंत घेतलेलं सर्व 98 स्वॅब निगेटिव्ह आले होते. हा रुग्ण आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.