CoronaVirus : नाकाबंदी भेदत आष्टी तालुक्यात प्रवेश करणाऱ्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 06:42 PM2020-04-28T18:42:23+5:302020-04-28T18:42:58+5:30
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून चोरट्या मार्गाने गावात प्रवेश केल्या प्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल
कडा : लाॅकडाऊन असताना प्रशासनाची नजर चुकवून चोरट्या मार्गाने नागरिकांचे गावात येणे सुरूच आहे. तालुक्यातील पांढरी, पारगाव जोगेश्वरी, आष्टी, येथे पुणे, कोल्हापूर, जामखेड येथुन आलेल्या चार जणांविरूध्द मंगळवारी सायंकाळी गुन्हे दाखल करण्यात आले.
पुणे येथुन पारगाव जोगेश्वरी या मुळ गावी दत्तात्रय भोसले व जामखेड येथुन गोविंद बळे यांनी चोरट्या मार्गाने गावात प्रवेश केला. याची माहिती मिळताच ग्रामसेवक बापु जगताप यांनी, आष्टी येथे पुणे जिल्ह्यातून आलेल्या खंडेराव देशपांडे यांच्यावर पोलीस नाईक प्रशांत क्षीरसागर यांच्या तर पांढरी येथे पुण्यावरून आलेल्या दिनकर बहिर यांच्यावर ग्रामसेवक निशा आदक यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चारही जणांवर संचारबंदी आदेश डावलून चोरट्या मार्गाने विनापरवाना प्रवेश करून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करत कोरोना विषाणूंचा संसर्ग पसरविण्याची भिती असताना प्रवेश केला म्हणून आष्टी पोलीस ठाण्यात मंगळवारी चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.